आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे राहते 'दीया और बाती...'ची भाभो, लग्नाच्या महिन्याभरापूर्वी खरेदी केले होते घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सप्टेंबर महिन्यात ऑफ एअर झालेल्या 'दीया और बाती हम' या मालिकेत संध्या (दीपिका सिंह) आणि सूरज (अनस राशिद) यांच्यासोबतच भाभो अर्थातच नीलू वाघेला यांची महत्त्वाची भूमिका होती. 46 वर्षीय नीलू राजस्थानी सिनेसृष्टीत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मुंबईत त्यांचे स्वतःचे घर आहे. divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचितमध्ये नीलू वाघेला यांनी त्यांच्या ड्रीम होमविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, सुरुवातीपासूनच मला असे घर हवे होते, जिथे पक्ष्यांची किलबिल ऐकू येईल. आणि एक दिवस स्वप्न पूर्ण झाले...

नीलू म्हणाल्या, "17 वर्षांपूर्वी आम्ही हे घर खरेदी केले होते. मात्र त्यावेळी हे खूप महागडे होते. मी आणि माझे पती अरविंद आम्ही लग्नापूर्वी घर घेण्याचा निर्णय घेतला होता. राजकोटमध्ये अरविंद यांचा मोठा बंगला आहे. मात्र आमचे करिअर मुंबईत होते. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर खरेदी करण्याची आमची इच्छा होती. दोघांसाठीही करिअरची सुरुवात खूप संघर्षातून झाली होती. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. माझ्या नव-याने नेहमीच मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. आमच्या करिअरमध्ये या घराचा मोठा वाटा आहे."

ट्रेडिशन आर्ट पीसेसनी केलीये घराची सजावट
नीलू यांनी सांगितले, "माझा आपल्या संस्कृतीवर विश्वास आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा मी ट्रेडिशन आर्ट पीसेजनी सजवला आहे. शिवाय इंटेरिअर वास्तूनुसार केले आहे. पुर्वी माझा वास्तूवर विश्वास नव्हता. मात्र काही नकारात्मक गोष्टी घडल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला. वर्षभरापूर्वी आम्ही वास्तूनुसार घरात काही बदल करुन घेतले. त्यानंतर घरात पॉझिटिव्हिटी आली. आता घरात सकारात्मक ऊर्जा मला जाणवते."

1999 साली खरेदी केले होते घर
नीलू आणि त्यांचे पती अरविंद वाघेला यांचे हे घर बोरिवली (मुंबई) येथे आहे. 2 BHK असलेला या फ्लॅटचा कार्पेट एरिया 1250 चौ.फुट इतका आहे. 1999 साली त्यांनी हे घर खरेदी केले होते. त्यानंतर महिन्याभराने दोघांनी लग्न केले होते. नीलू आणि अरविंद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वंशिका हे त्यांच्या मुलीचे तर कैजेर हे मुलाचे नाव आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भाभोच्या घराचे एक्सक्लुझिव्ह PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...