आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस लूकमध्ये दिसली 'IPS' संध्या, एमबीए करून बनली प्रसिध्द अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ- मुलगी, सून आणि आता आयपीएस ऑफिसर अशा भूमिकेत दिसणारी 'दिया और बाती'मधील संध्या अर्थातच दीपिका सिंहला जेव्हा या तीनही पात्राविषयी विचारले. यावर तिने सांगितले, 'माझ्यासाठी हा प्रवास खूपच रंजक होता. खूप आव्हान होते मात्र त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. हे पात्र खूपच प्रेरणादायी होते.' दीपिका दिल्लीची रहिवासी आहे.
शिक्षणानंतर नोकरी आणि वेळ असल्यास वडिलांचा बिझनेस सांभाळायची. अशा आयुष्यात ती अभिनयाकडे कशी वळाली? या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिका सांगते, 'अभिनेत्री होण्याची माझी सुरुवातीलपासून इच्छा होती. परंतु कधी तशी योजना केली नाही. माझ्या मनाने जे सांगितले, ते मी केले. कॉलेजच्या दिवसांत काही फ्रेंड्स जाहिरातीच्या एजेन्सीमध्ये काम करायचे तर काही मॉडेलिंगमध्ये. बाहेरच्या जगाचा अनुभव घेण्यासाठी मीसुध्दा अशा असाइनमेन्ट करायला लागले. एमबीएनंतर दिल्लीमध्ये एक वर्षे एक नाटक केले. त्यानंतर मुंबईला रवाना झाले. मग काय संध्याचे पात्र मिळाले. परंतु यातून मला इतकी प्रसिध्दी मिळेल हे ठाऊक नव्हते.'
संध्याने सांगितले आनंदाचे रहस्य-
दीपिकाने या शोचे दिग्दर्शक रोहित राज गोयलसोबत लग्न केले. दीपिकाने सांगितले लग्नानंतर खूप रिलॅक्स वाटत होते. सेटवरसुध्दा घरातील तणाव न घेता काम करते. त्यामुळेच ती आपले संध्याचे पात्र चांगल्याप्रकारे करू शकते. तिच्या लग्नामुळे ती आणि तिचे कुटुंबीयसुध्दा आनंदी आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चंदीगढला पोहोचलेल्या दीपिका सिंहची छायाचित्रे...