आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diya Aur Bati Hum Emily Aka Pooja Singh Life In Pics

PIX:'दीया और बाती'मधील एमलीसाठी सोपा नव्हता अभिनयातील प्रवास, जाणून घ्या बरेच काही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दीया और बाती हम' या मालिकेत एमली मोहित राठी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सिंह. पडद्यावर नेहमी साडी आणि दागिन्यांत वावरणारी पूजा खासगी आयुष्यात मात्र मुळीच तशी नाहीये. तिला खासगी आयुष्यात वेस्टर्न आउटफिट घालणे पसंत आहे.
कोण आहे पूजा सिंह
पूजा सिंह मुळची जमशेदपूरची आहे. येथेच तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी पूजा पुण्यात दाखल झाली. येथे तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. कॉलेज जीवनात असताना तू टीव्ही बहूची भूमिका साकारु शकते, असे अनेकांनी सांगितल्यानंतर पूजाने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला.
सोपा नव्हता अभिनयातील प्रवास-
या इंडस्ट्रीत एका क्षणात नशीब पालटत नाही, हे पूजाने अनुभवले आहे. पूजा ऑडीशन देण्यासाठी पुणे ते मुंबई असा प्रवास करायची. ऑडीशन दिल्यानंतर तिची निवड व्हायची, कॉन्ट्रॅक्ट साइन व्हायचा, मात्र शेवटच्या क्षणी प्रोजेक्ट बंद पडायचा. असे अनेकदा घडले. मात्र पूजाने हिंमत सोडली नाही. अखेर तिला 'आसमा से आगे' या मालिकेत अपूर्व अग्निहोत्रीच्या लहान बहिणीची भूमिका मिळाली. त्यानंतर ती 'जय जय बजरंग बली', 'हाऊसवाईफ है सब जानी है' या मालिका मिळाल्या. या मालिकांमधील अभिनय पाहून तिला 'दीया और बाती हम' या मालिकेची ऑफर मिळाली.
केवळ 22 वर्षांची आहे पूजा-
पूजा 22 वर्षांची असून सूनेची भूमिका साकारणे एन्जॉय करत आहे. या भूमिकेविषयी ती म्हणते, ''मला पूर्वीपासूनच सासबहू शो करायची इच्छा होती. कसोटी जिंदगी की, कहानी घर घर की या मालिका बघत मी मोठी झाली. पार्वती बहूसारखी भूमिका साकारण्याची माझी इच्छा होती. नशीबाने मला ही मालिका मिळाली आणि मी माझी भूमिका एन्जॉय करत आहे.''
छोट्या शहरातून मोठ्या शहरात -
पूजा एमलीपेक्षा खूप वेगळी आहे. खासगी आयुष्यात ती स्वतंत्र तरुणी आहे. आता मुंबईसारख्या शहरात ती एकटी राहते. घरातील साफसफाईपासून ते स्वयंपाकापर्यंतची सर्व कामे ती स्वतःच करते. आईवडिलांच्या पाठिंब्याशिवाय मुंबईतील प्रवास सोपा नव्हता, असे पूजा सांगते. पूजाचे वडील बँकेत आहेत, तर आई गृहिणी आहे. त्यांनी कधीच लग्न किंवा करिअरविषयी बळजबरी केली नसल्याचे पूजा सांगते. मुलीने लग्नापूर्वी स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे मत पूजाचे आहे.
उत्कृष्ट बेले डान्सर -
पूजा ट्रेन बेले डान्सर असून सध्या ती कथ्थक आणि हिपहॉपचे प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तिची इच्छा आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला पूजाची खागसी आयुष्यातील खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा खासगी आयुष्यात किती बिनधास्त आहे पूजा...