आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिंगपूर्वी काय करायची \'गोपी बहू\', कळलं तर मुळीच विश्वास बसणार नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनस्क्रिन नेहमीच साडी आणि सूटमध्ये दिसणारी देवोलिना खासगी आयुष्यात ग्लॅमरस आहे. - Divya Marathi
ऑनस्क्रिन नेहमीच साडी आणि सूटमध्ये दिसणारी देवोलिना खासगी आयुष्यात ग्लॅमरस आहे.
एन्टरटेन्मेंट डेस्कः काळानुसार भारतीय टेलिव्हिजनचा पडदा बदलत गेला आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीसुद्धा बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत ग्लॅमरस आणि बोल्ड झाल्या आहेत. जगभरातून टीव्ही स्टार्सना अटेंशन मिळू लागले आहे. सध्या प्रसिद्धीझोतात असलेली अशीच एक टीव्ही अॅक्ट्रेस आहे आणि ती म्हणजे देवोलिना भट्टाचार्जी अर्थातच 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील 'गोपी बहू'. या मालिकेतील लीड अॅक्ट्रेस जिआ मानेकने 2012 मध्ये ही मालिका सोडल्यानंतर देवोलिनाची मालिकेत एन्ट्री झाली. अल्पावधीतच देवोलिनाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. केवळ 25 वर्षांची देवोलिना मालिकेत तिच्याच वयाच्या मुलींच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. ऑनस्क्रिन साड्या आणि सलवार सूटमध्ये एलिगेंट दिसते. मात्र याच गोपी बहू अर्थातच देवोलिनामध्ये एक हिडन टॅलेंट असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?
होय, देवोलिनामध्ये एक सुप्त गुण आहे आणि तो म्हणजे ती एक ट्रेन्ड क्लासिकल डान्सर आहे. याच क्षेत्रात तिला करिअर करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिने तयारीसुद्धा सुरु केली होती. तिच्या या टॅलेंटविषयी सांगणारा एक व्हिडिओ आम्हाला युट्यूबवर मिळाला आहे. 2010 मध्ये जेव्हा देवोलिनाने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले नव्हेत, तेव्हा ती आपल्या नृत्याची झलक दाखवण्यासाठी 'डान्स इंडिया डान्स' या गाजेलल्या डान्स रिअॅलिटी शोच्या दुस-या सीझनमध्ये ती ऑडिशनमध्ये पोहोचली होती. या सीझनमध्ये ती सिलेक्टसुद्धा झाली होती. यावेळी ती ऑरेंज आणि ब्लू क्लासिकल डान्स कॉश्च्युम परिधान करुन ऑडिशन द्यायला पोहोचली होती.
या रिअॅलिटी शोमध्ये देवोलिनाची निवड झाल्यानंतर तिने जो काही आनंद व्यक्त केला होता, ते बघून शोची जज गीता कपूर अवाक् झाली होती.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन तुम्ही देवोलिनाचा 2010 मधील डान्स इंडिया डान्सच्या ऑडिशनचा व्हिडिओ बघू शकता.. हीच ती देवोलिना आहे, यावर क्षणभर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. अतिशय सुंदर नृत्य तिने या शोमध्ये सादर केले होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)