आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Does Kapil Sharma Wear A Wig For Comedy Nights Or Is This A Hair Transplant?

\'कॉमेडी नाइट्स विथ...\'साठी कपिल शर्माने केले हेअर ट्रान्सप्लांट की घालतो विग?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमुळे प्रसिद्धीचे वलय प्राप्त करणारा विनोदवीर म्हणजे कपिल शर्मा. आपल्या चटपटीत विनोदाने कपिल प्रेक्षकांना पोटधरुन हसायला भाग पाडतो. याशिवाय तो शोबिजमधील मोस्ट एलिजिबल बॅचलरसुद्धा ठरला आहे. केवळ सहा महिन्यांच्या काळात त्याची फॅन फोलोईंग प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये महिलांचा समावेश जास्त आहे. 'कॉमेडी नाइट्स..'मुळे कपिलला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढीच त्याच्या काही विनोदांमुळे त्याच्यावर टीकाही झाली.
असो, आता पुन्हा एकदा कपिलच्या नावाची चर्चा होतेय. मात्र ही चर्चा त्याच्या विनोदांमुळे नव्हे तर केसांमुळे होतेय. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोसाठी कपिलने आपला लूक चेंज केल्याचे म्हटले जात आहे. 2007 मध्ये ग्रेट इंडियन लाफ्टर शोमधून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला कपिल आणि आताचा कपिल यात बराच फरक पडलेला दिसतोय. सहा वर्षांपूर्वी कपिलच्या डोक्यावरील केस फार कमी होते. मात्र आता कपिलकडे बघितले असता, त्याने एक तर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली असावी, किंवा तो केसांचा विग वापरतो असं दिसून येतं. आम्ही तुम्हाला आता जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून तुमच्याही नक्की हे लक्षात येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कपिलचा पूर्वीचा आणि आत्ताचा लूक...