आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drashti Dhaami Will No More Host Jhalak Dikhla Jaa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'झलक दिखला जा'मधून दृष्टी धामीची सुटी, चॅनलने दाखवला बाहेरचा रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('झलक दिखला जा'च्या सेटवर दृष्टी धामी आणि रणवीर शौरी)
मुंबई - छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमध्ये दृष्टी धामी सूत्रसंचालकाच्या रुपात झळकत होती, मात्र तिचे सादरीकरण बघून कदाचित निर्माते खुश नव्हते. त्यामुळे अखेर शोच्या निर्मात्यांनी या शोमधून दृष्टिला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही तासांपूर्वी स्वतः दृष्टीने ही बातमी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना दिली. दृष्टीने ट्विटरवर ट्विट केल, 'झलक दिखला जा'मधून माझा प्रवास आता संपणार आहे. तुमच्या प्रेमासाठी आभार.' काही दिवसांपूर्वी दृष्टीने 'झलक दिखला जा'च्या सेटवर वारंवार होणा-या रिटेकविषयी आपल्या चाहत्यांना पुसटशी कल्पना दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दृष्टी धामी आणि रणवीर शौरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली नाही. आपल्या सूत्रसंचालनामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ती असमर्थ ठरत होती. त्यामुळे वाहिनीला हे पाऊल उचलावे लागले. खरं तर दृष्टिला शोमधून काढणे हा कठीण निर्णय होता. मात्र अखेर प्रश्न हा टीआरपीचा होता.
इतकेच नाही तर येत्या 12 जुलैपासून दृष्टीची प्रमुख भूमिका असलेली 'मधुबाला' ही मालिकासुद्धा ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे आता दृष्टीचा कलर्स वाहिनीसोबत असलेला करार संपुष्टात आला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दृष्टीने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले, ''रात्री वाहिनीच्या वतीने मला रिप्लेस करण्यात येत असल्याची माहिती दिली. माझा प्रवास एवढ्या लवकर संपेल, असे वाटले नव्हते. प्रामाणिकपणे सांगते, मी या शोमध्ये खूप चांगला वेळ घालवला आहे. मात्र आता हा प्रवास माझ्यासाठी
संपुष्टात येतोय. सर्व स्पर्धक आणि वाहिनीला माझ्या शुभेच्छा.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन निवडक छायाचित्रांमध्ये पाहा दृष्टी धामीचा 'झलक दिखला जा'च्या मंचावरील प्रवास...