आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TV अॅक्टरने केले ट्रांसफॉर्मेशन, शोसाठी वाढवले होते 20Kg वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अॅक्टर मेहरजान याने ड्रास्टिक ट्रांसफॉर्मेशन केले आहे. - Divya Marathi
टीव्ही अॅक्टर मेहरजान याने ड्रास्टिक ट्रांसफॉर्मेशन केले आहे.

मुंबई - मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही कलाकार आता आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेत आहेत. टीव्ही शो 'ढाई किलो प्रेम' ऑफएअर झाला आहे. या शोमध्ये पीयूषची भूमिका साकारणारा अॅक्टर मेहरजान माजदा आता नव्या लूकमध्ये समोर आला आहे. महेरजान नव्या लूकमध्ये फिट आणि परफेक्ट दिसत आहे. मेहरजानने  'ढाई किलो प्रेम' शोसाठी जवळपास 20 किलो वजन वाढवले होते. त्याने या शोसाठी स्वतःचे वजन 108 किलोपर्यंत नेले होते. आता त्याने 8 किलो वजन घटवले आहे. येणाऱ्या काळात तो आणखी 6 किलो वजन कमी करणार आहे.  'ढाई किलो प्रेम' शोचा शेवटचा एपिसोड 30 सप्टेंबरला प्रसारित झाला होता. 

 

शो बंद झाल्यानंतर वजन कमी करण्यास केली सुरुवात... 
- मेहरजानने शो बंद झाल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला. त्याने एका महिन्यात 8 किलो वजन घटवले आहे. तो अजूनही त्याचे वजन कमी करण्यावर काम करत आहे. त्यासाठी त्याने त्याचा डाएट निश्चित केला असून जिममध्ये भरपूर घाम गाळत आहे. 

- मेहरजानने एका मुलाखतीत सांगितले, की सीरियलसाठी त्याने वजन वाढवले होते. त्यासाठी त्याने याकाळात त्याच्या आवडीच्या पदार्थांवर मनमुराद ताव मारला होता. तो म्हणाला होता, की  'ढाई किलो प्रेम' मधील माझ्या भूमिकेवर आई प्रचंड नाराज होती. तिला बिल्कूल वाटत नव्हते की मी वजन वाढवावे. आईला चिंता वाटत होती, की मी जाड दिसायला लागल्यानंतर माझ्या लग्नात प्रॉब्लेम येईल. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेहरजानचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...