आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational Qualification Of The Kapil Sharma Show Starcast

जाणून घ्या, किती शिकले आहेत कपिलसह \'The Kapil Sharma Show\' चे कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 23 एप्रिलपासून विनोदवीर कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा' शो सुरु झाला आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो बंद पडल्यानंतर कपिलने आता दुस-या वाहिनीवर आपल्या जुन्याच टीमसोबत कमबॅक केले आहे. सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर, अली असगर, नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील ग्रोवरसह कपिल प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. त्याच्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये किंग खान शाहरुखने हजेरी लावली होती. कपिलच्या पुनरागमनामुळे त्याचे चाहते अतिशय आनंदी आहेत. त्याच्या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कपिलची टीममध्ये विनोदाचा हुकमी एक्का ठरली आहे. मात्र या कलाकारांविषयीच्या फारशा गोष्टी लोकांना ठाऊक नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले, तर हे सर्व कलाकार किती शिकले आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या कपिलपेक्षा शोमध्ये 'चहावाला' बनलेला अभिनेता चंदन प्रभाकर अधिक शिकला आहे. कपिल केवळ ग्रॅज्युएट आहे, तर चंदन इंजिनिअर आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या शोमधील कलाकारांचे शिक्षण किती झाले, याची खास माहिती वाचकांनासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घ्या किती शिकले आहेत, हे कलाकार...