आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपर नॅचरल आहे हा टीव्ही शो, भूतासोबत आहे लव्ह ट्रँगल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोचे एक पोस्टर. - Divya Marathi
शोचे एक पोस्टर.

मुंबई - सोनी टीव्हीचा शो 'एक दिवाना था' सुपर नॅचरल थीमवर आहे. शरण्याची भूमिका डोनल बिष्ट साकारत आहे, तर व्योमच्या रोलमध्ये विक्रम सिंह चौहान आहे. शोमध्ये शरण्याच्या मागे शिव नावाचे एक भूत लागते. शिव या भूताचे सत्य अद्याप समोर आलेले नाही. त्याला काय पाहिजे हेही कळालेले नाही. हे भूत कोणालाही जवळ येऊ देत नाही, एवढेच आतापर्यंत कळाले आहे. 

या शोमध्ये व्योमची भूमिका साकारणाऱ्या विक्रम सिंह चौहाने DivyaMarathi.Com सोबत केलेली खास बातचीत... 


शोमधील तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील. येत्या काही दिवसांमध्ये या रोलमध्ये काय बदल होणार आहेत? 
- 'एक दिवाना था'ची संपूर्ण कथा शिव, शरण्या आणि व्योम यांच्या रोमँटिक प्रवासावर आहे. या तिघांच्याही फार वेगळ्या भूमिका आहेत. व्योम हे जे कॅरेक्टर आहे, ते माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. व्योम एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. तो भडक आणि फ्लॅशी नाही. व्योम हे कॅरेक्टर कसे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शो पाहावा लागेल. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाल ट्विस्ट पाहायला मिळतील. 

 

ही भूमिका तुला कशी मिळाली?
- जेव्हा मी 'जाना न दिल से दूर'हा शो करत होतो, तेव्हा मला 'एक दिवाना था'चा लेखक आणि निर्माता असलेल्या प्रतिकचा कॉल आला. त्याने मला सांगितले की तो मला व्योमच्या भूमिकेसाठी कास्ट करणार आहे. त्याच्या दृष्टीने या रोलसाठी मी परफेक्ट होतो. त्यासोबतच मी मॉक शूटही केले. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, विक्रमचा आहे का सुपर नॅचरल शक्तींवर विश्वास... 

बातम्या आणखी आहेत...