आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eka Lagnachi Dusari Goshta Wind Up On 25th August

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२५ ऑगस्टला घना-राधा घेणार आपला निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर तुफान गाजणारी एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २५ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेतील घना आणि राधा प्रेक्षकांना आपल्या घरातले वाटू लागले. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांनी रंगवलेल्या राधा आणि घनाची व्यक्तिरेखा तुफान हिट झाल्या. फेसबूकवरही ही मालिका हिट झाली.

सध्या मालिकेत घना आणि राधा वेगळे होणार असे दिसत आहे. मात्र निर्माता आणि दिग्दर्शकांनी या मालिकेचा शेवट गोड करण्याचे ठरवले असल्याचे सुत्रांकडून समजते. मालिकेत शेवटी घना आणि राधा एकत्र आलेले दिसणार आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबात जल्लोषाचे वातावरण असणार आहे.
घना आणि राधाच्या लग्नाची दुसरी गोष्टी संपल्यानंतर त्याच्या जागी नवी महेश तागडे यांची नवी मालिका सुरु होणार आहे.
घना आणि राधा निरोप घेत असल्यामुळे प्रेक्षक त्यांना मिस करतील हे नक्की.
व्हिडिओ : घना-राधाची रोमॅण्टिक गोष्ट 'तुझ्या विना...'
PHOTOS : ... अन् राधा-घना प्रेमात पडले