आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Kapoor Bows Down To Protests, Pulls Out Of Jodha Akbar

वादांना वैतागली एकता कपूर, सोडली 'जोधा-अकबर'ची साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानसारख्या मोठ्या राज्यात सिनेमा रिलीज झाला नाही तर कोणत्याही निर्मात्याला त्यातून मोठा तोटा होणार हे नक्की. म्हणूनच एकता कपूरने या तोट्यापासून वाचण्यासाठी सुरक्षित निर्णय घेतला आहे. 'जोधा अकबर' ही टीव्ही मालिका जेव्हापासून प्रसारित झाली आहे तेव्हापासून एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सला अनेक वादांना समोरे जावे लागले आहे. सतत वेगवेगळच्या वादाच्या भोव-यात सापडणा-या या मालिकेमधून एकताने मुक्ती मिळवली आहे.
कारण आहे, की राजस्थान आणि इतर शहरांमध्ये तिचे आगामी सिनेमांचे प्रदर्शनावर बंदी घालण्यात येऊ शकते. जसे 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा'च्या प्रदर्शनाच्या वेळेस झाले होते. जयपुर आणि इतर परिसरातील राजपूत सेनेच्या वितरकांनी हा सिनेमा रिलीज करण्यासाठी बंदी घातली होती. 12 वाजता प्रदर्शित होणारा सिनेमा एकताच्या वादामुळे 3 वाजता प्रदर्शित करावा झाला होता.
कोणत्याही दबावाखाली न येता तिने मालिकेचे नाव बदलेले नाही. फक्त मालिकेच्या सुरूवातीला लिहिले, की ही कहाणी ऐतिहासिक पात्र जोधाची नसून एका राजपूत घराण्यातील तरूणीची आहे. याव्यतिरिक्त एकता जयपूरच्या एका कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेली होती, तेव्हा तिथे तिला लोकांनी काळे झेंडे दाखवून मालिकेचा निषेध केला होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या एकताला का असा निर्णय घ्यावा लागला? याविषयी तिचे काय म्हणणे आहे?