(फाइल फोटो : एकता कपूर आणि तिच्या हातावर दिसत असलेले तावीज)
मुंबई - अंधविश्वास... अशी एक गोष्ट आहे, जी लोकांना पूर्णपणे बदलून टाकते. अंधश्रद्धाळू लोक प्रत्येक क्षेत्रात आहेत. मग बॉलिवूडला विसरुन कसं बरं चालेल. इंडस्ट्रीतील निर्माते-दिग्दर्शक असो किंवा स्टार्स असो, यश मिळवण्यासाठी हे लोक अनेकदा अंधश्रद्धाळू होतात. एकता कपूर इंडस्ट्रीतील ती व्यक्ति आहे, जी स्वतःला अंधश्रद्धाळू समजत नाही. मात्र यश मिळवण्यासाठी ती ज्या पद्धतींचा अवलंब करत असते, ते बघता कुणीही तिला कुणीही अंधश्रद्धाळू म्हणेल.
आता बातमी आहे, की एकता कपूर आपल्या नवीन मालिकेच्या मुख्य कलाकारांची निवड करण्यापूर्वी त्यांच्या कुंडलीसोबत आपली कुंडली जुळवते. जर कुंडली मॅच होणारी असेल तरच ती कलाकारांची अंतिम निवड करते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकता ज्योतिषीच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. मग ते करिअर असो किंवा खासगी आयुष्य. ज्योतिष विद्या आणि अंकशास्त्रावर तिचा गाढ विश्वास आहे. मात्र आता एकता एक पाऊल पुढे निघाली आहे. एखाद्या नवीन शोसाठी मुख्य कलाकारांची निवड करण्यापूर्वी त्यांच्या कुंडलीशी ती आपल्या कुंडली जुळवून घेते. मग ती अभिनेत्री किंवा अभिनेता कितीही सुंदर आणि टॅलेंटेड असो, शोमध्ये त्याचे सिलेक्ट होणे हे त्याच्या कुंडलीवर अवलंबून असते.
सूत्रांनी सांगितले, अलीकडेच एकताच्या 'मेरी आशिकी तुमसे ही' या नवीन मालिकेसाठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी ऑडिशन दिल्या होत्या. मात्र शक्ति अरोडा आणि राधिका मदन यांची निवड मालिकेसाठी झाली. कारण या दोघांची कुंडली इतर कलाकारांच्या कुंडलीपेक्षा जास्त जुळली. त्यामुळे या दोघांची निवड मालिकेसाठी झाली.
एकता कपूरच्या आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स जाणून घेतल्यानंतर तुम्ही अंदाज बांधू शकाल, की ही एकताची अंधश्रद्धा की आस्था?
जाणून घ्या तिच्या आयुष्यातील असेच काही फॅक्ट्स...