आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूरचा खुलासा- विकाससोबत रिलेशनशिपमध्ये होता टीव्ही अभिनेता पार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : एकता कपूर, इन्सेटमध्ये डावीकडून निर्माता विकास गुप्ता आणि अभिनेता पार्थ समंथान - Divya Marathi
फाइल फोटो : एकता कपूर, इन्सेटमध्ये डावीकडून निर्माता विकास गुप्ता आणि अभिनेता पार्थ समंथान
मुंबई- टीव्ही अभिनेता पार्थ समंथान आणि निर्माता विकास गुप्ताच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. एकता कपूरच्या सांगण्यानुसार पार्थ आणि विकास कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. हा धक्कादायक खुलासा तिने एका मुलाखतीत केला.
पार्थ आणि विकासच्या नात्याविषयी काय म्हणाली एकता...
एकता कपूरने खुलासा करून सांगितले, 'विकास आणि पार्थ रिलेशनशिपमध्ये होते. 7 डिसेंबर 2013ला पार्थने विकासवर चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्याला आरोप लावला आणि त्याच्या 20 दिवसांनंतर दोघे बँकॉकमध्ये सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. मला हे माहिती आहे, कारण त्यावेळी मीसुध्दा न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी तिथे गेले होते. मी विकासप्रती त्याचे अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत.'
का विकासच्या विरोधात गेला पार्थ...
एकता कपूरने या मुलाखतीत असेही सांगितले, की पार्थ का विकासच्या विरोधात गेला. एकताच्या सांगण्यानुसार, 'विकाससोबतचे नाते संपुष्टात आल्याने पार्थ त्याच्या विरोधात गेला. परंतु तो विसरला आहे, की विकासने त्याचे करिअर उभा केला आहे. दोघे तीन वर्षे एकत्र होते. कुणावर छेडछाड आणि बलात्काराचा आरोप लावणे सोपे आहे. पूर्वी अभिनेत्री असे करायच्या. परंतु आता अभिनेत्यांनीसुध्दा याचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.'
काय आहे प्रकरण?
- डिसेंबरमध्ये पार्थने विकाससाठी एक कायदेशीर नोटिस पाठवली होती. त्यामध्ये विकासवर चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्याचा आणि त्याचे मानधन न दिल्याचा आरोप लावला होता.
- पार्थने विकासच्या विरोधात व्हर्सोवा पोलिस ठाण्यात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी विकासला नोटिस पाठवली आणि त्याचा जबाब नोंदवून घेतला.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, विकासचे म्हणणे होते, की डिसेंबर 2013मध्ये पार्थने त्याच्या मोलेस्टेशनचा आरोप लावला होता. परंतु त्यानंतर दोघे थायलँडसाठी रवाना झाले. इतकेच नव्हे, पार्थने त्याच्या पाच शोमध्ये काम केले आहे. म्हणून मानधन देण्याच्या आरोपात काहीच दम नाहीये.
मीडियाला काय म्हणाला पार्थ-
प्रकरणात मीडियाने पार्थसोबत बातचीत केली. पार्थ म्हणाला, 'मी विकाससोबत त्याच्या 'प्यार तुने क्या किया' शोमध्ये काम केले, परंतु त्याचे मानधन 5.5 लाख रुपये मला दिले नाही. उलट माझ्याकडून 50 लाख रुपये मागत आहे. त्याने मला करिअर उध्वस्त करेल अशी धमकीदेखील दिली आहे. याविषयी मी पोलिसांना सांगितले. माझे त्याच्याशी काहीच शत्रुत्व नाहीये. आम्ही चांगले मित्र होतो. त्याने मला करिअरमध्ये खूप मदत केली आणि त्यासाठी मी त्याचा आभारी आहे. परंतु माझ्या कष्टाला दुर्लक्षित केले जाऊ शकते.'
विकासने घेतला वकीलाचा आधार-
विकासने स्वत: मीडियासोबत बातचीत केली नाही. त्याने त्याच्या वकिलाला पुढे केले. वकिलानुसार, 'विकास कठिण परिस्थितीतून जात आहे. एखाद्या निर्मात्यावर एक अभिनेता मोलेस्टेशन आणि एक्सटोर्शन मनी मागितल्याचा आरोप लावतो, यापेक्षा विचित्र गोष्ट काय असू शकते. विकास लवकरच या प्रकरणात कायद्याचा आधार घेऊन अॅक्शन घेणार आहे आणि याचिकाकर्त्याच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल करणार आहे.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विकाससोबत पार्थचे फोटो, पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...