आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉसमधून Out झालेल्या सपनाने सांगितले - अखेर का केला होता सुसाइडचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी. - Divya Marathi
सपना चौधरी.

मुंबई - हरियाणाची रागिनी गायिका-डान्सर सपना 'बिग बॉस-11'मधून बाहेर पडली आहे. बाहेर आल्यानंतर DivyaMarathi.Com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये सपनाने रियालिटी शो सोबत तिच्या पर्सनल लाइफबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. सप्टेंबर 2016 मध्ये सपनाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यामागचे कारण काय होते, हेही सपनाने सांगितले आहे. 

 

सपनासोबतची खास बातचीत...
- फेब्रुवारी 2016 मध्ये सपनाने तिच्या एका कार्यक्रमात दलित समाजाचा अवमान केल्याचा आरोप झाला होता. या संदर्भात तिच्यावर गुन्हा दाखल जाला होता. त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचे सपनाने सांगितले. या डिप्रेशनमध्येच सप्टेंबर 2016 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 
- सपना  म्हणाली, 'मला आणि माझ्या आईला या आरोपांचा फार त्रास झाला होता. हा त्रास असह्य झाला होता. माझ्यावर असा आरोप करण्यात आला होता, जे मी केलेच नाही. यामुळे माझ्या आईला खूप त्रास झाला होता. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. त्याकाळात कोणाचाच सपोर्ट मिळाला नाही.'
- 'तेव्हा असे वाटले की आता आयुष्यात काहीच राहिले नाही. आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. मात्र नंतर कळाले की आपण फार मोठी चूक केली होती.'
- 'या घटनेला आता एक वर्ष होऊन गेले आहे. मात्र आजही त्या घटनांची आठवण झाली तर अंग शहारुन येते. मला डिप्रेशनमधून बाहेर येण्यास आईने फार मदत केली. मी कायम तिची ऋणी राहील.'
-  26 वर्षांच्या सपना चौधरीने वयाच्या 12व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर डान्स परफॉर्मन्स करुन घर चालवले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी काय म्हणाली सपना चौधरी....

बातम्या आणखी आहेत...