आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली ही प्रसिद्ध TV अॅक्ट्रेस, वयाच्या 26 व्या वर्षीच आला हार्ट अटॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतील चारु अर्थातच अभिनेत्री आंचल खुराणाला अलीकडेच दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या 26 वर्षीय अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला होता. स्वतः आंचलने या गोष्टीचा उलगडा केला. एका प्रसिद्ध एन्टरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, की जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा ती वाचेल असे कुणालाही वाटले नव्हते.

आंचल म्हणाली, सर्वांना सोडली होती आशा
आंचलने मुलाखतीत सांगितले, "ही पाच दिवसांपूर्वीची घटना आहे. सर्वकाही अचानक घडले. माझे हृदय सुन्न पडले आणि मला वीकनेस जाणवू लागला. मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी तातडीने मला दाखल करुन घेतले. माझे ब्लडप्रेशन 180-190 झाले होते आणि माझे शरीर माझी साथ सोडू लागले होते. मला उलटी होऊ लागली आणि डोळेसुद्धा पांढरे पडले होते. डॉक्टर हे बघून हैराण झाले होते. माझे आईवडील खूप घाबरले आणि जोरजोरात रडू लागले होते. सर्वांनीच मी जिवंत राहील, अशी आशा सोडून दिली होती."

कधीच विसरु शकत नाही तो दिवस
आंचल म्हणाली, "ही देवाचीच कृपा की मी या संकटातून बाहेर पडले. मला मायनर हार्ट अटॅक आला होता. मी आता रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. नशीबाने त्यावेळी माझे आईवडील माझ्यासोबत दिल्लीतच होते. मी तो दिवस कधीच विसरु शकत नाही. कारण मी मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे. देवाकडे माझ्या आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना करा."

या मालिकांमध्ये झळकली आहे आंचल
आंचलने 'सपने सुहाने लडकपन के' के अलावा 'अर्जुन', 'सावधान इंडिया', 'आहट', 'सीआईडी', सरोजनी' आणि 'मेरी सासू मां' या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती रोडीज 8 या एमटीव्ही शोची विजेतीसुद्धा ठरली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा आंचलची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...