आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EXCLUSIVE: First Look Of Dayaben Aka Disha Vakani’s Reception Ceremony!

EXCLUSIVE: पाहा 'दया बेन' उर्फ दिशा वाकाणीच्या वेडिंग रिसेप्शनचे Inside फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वाकाणी 24 नोव्हेंबर रोजी मयूर पारीखसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नाच्या दोन दिवसांनी म्हणजे 26 नोव्हेंबरला मुंबईतील जुहूस्थित सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांच्या वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा द्यायला अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अभिनेते जितेंद्र यांनी नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रिसेप्शनला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची संपूर्ण टीम पोहोचली होती. निर्माते असित मोदी, दिलीप जोशी, गुरुचरण सिंग, सोनालिका जोशी, श्याम पाठक, अंबिका रंजरकर, आझाद कवी, कुश शाहसह अनेक सेलेब्स आपापल्या कुटुंबासह रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते.
मयूर ग्रीन तर दिशा दिसली गोल्डन आउटफिटमध्ये
नवविवाहित दाम्पत्य यावेळी अतिशय सुंदर दिसले. मयूर पारीख यांनी ग्रीन शेरवानी परिधान केली होती. तर नववधू दिशाने गोल्डन ब्राउन कलरचा गाऊन परिधान केला होता. पिंक लिपस्टिकने तिने आपला लूक परफेक्ट बनवला.
24 नोव्हेंबरला ओशिवारा (मुंबईतील) येथील माहेश्वरी हॉलमध्ये झाले लग्न
दिशा आणि मयूर यांचे लग्न मुंबईतील ओशिवारा परिसरातील माहेश्वरी हॉलमध्ये पार पडले. सकाळी 11 वाजत्या मुहूर्तावर हे दोघे विवाहबद्ध झाले. गुजराती पद्धतीने हा लग्नसोहळा रंगला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मयूर आणि दिशा यांच्या वेडिंग रिसेप्शनमधील इनसाइड फोटोज...