मुंबईः टीव्ही स्टार करण पटेलने अखेर अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत सप्तपदी घेतल्या. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये शाही थाटात दोघे विवाहबद्ध झाले. लग्नात करणने गोल्डन-रेड आणि व्हाइट कॉम्बिनेशनची शेरवानी घातली होती. तर अंकितानेही व्हाइट आणि रेड कॉम्बिनेशनचा लहेंगा परिधान केला होता.
लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर करण आणि अंकिताने मीडियासोबत बोलताना
आपला आनंद व्यक्त केला. "आम्ही दोघेही खूप आनंदी असून नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत. हा आमच्या आयुष्यातील खूप खास क्षण असून देवाचा, मोठ्यांचा आणि चाहत्यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. लग्नसोहळ्यात सर्व गोष्टी छान जुळून आल्या," असे करण पटेल म्हणाला.
तर नववधू अंकितानेही आपला आनंद व्यक्त करताना म्हटले, "शेरवानीत करण खूप क्यूट दिसतोय. सप्तपदी घेताना आम्ही दोघेही खूप हसत होते. हा माझ्या आयुष्यातील खूप सुंदर क्षण आहे."
या दोघांना त्यांच्य हनीमून प्लानविषयी विचारले असता, ते सिक्रेट असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अंकिता-करणच्या सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंतची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर