आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Inside Photos Of Gurmeet Choudhary’S Home

Inside Photos: पाहा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल गुरमीत-देबीनाचे ड्रीम होम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता गुरमीत चौधरी)
मुंबईः टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 'खामोशियां' या सिनेमाद्वारे तो सिल्व्हर स्क्रिनवर आपले नशीब आजमावरणार आहे. याच निमित्ताने divyamarathi.comने केवळ त्याच्यासोबत बातचीतच केली नाही, तर त्याच्या घराची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रेसुद्धा वाचकांना दाखवत आहे.
प्र. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय कधी घेतला?
उ. तारुण्यात पदार्पण करताच अभिनेता होण्याचे मी ठरवले. टीव्हीवर सिनेमे बघून मी डान्स करायचे. घरी सर्वांनी माझे नाव शशी कपूर ठेवले होते. माझे आजोबा त्यांचे मोठे चाहते होते. मुंबईत आल्यानंतर अभिनेता होण्याचा ठाम निर्णय घेतला. वयाच्या 18व्या वर्षी करिअरला सुरुवात केली. या प्रवासात मला वडिलांचा मोठा पाठिंबा होता.
प्र. पहिली संधी कधी मिळाली?
उ. हा प्रवास सोपा नव्हता. अनुभवातूनच पुढचा प्रवास करता येतो. टीव्ही इंडस्ट्रीतून करिअरला सुरुवात केली. कारण अभिनयाविषयी सर्वकाही मला शिकायचे होते. मोठा ब्रेक मिळवण्यासाठी स्वतःला परफेक्ट करणे गरजेचे आहे, हे मला ठाऊक होते. सुरुवातीच्या काळात छोटे भूमिका साकारल्या. या भूमिकांसाठी दोन-तीन ओळीच पाठ कराव्या लागायच्या. 'रामायण' ही मालिका मिळाली, तेव्हा माझे वय 22 वर्षे होते. त्यावेळी कॅमेरा फेस करताना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला होता.
प्र. पहिला शॉट तुझ्या लक्षात आहे का?
उ. होय नक्कीच. पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना खूप अवघडल्यासारखे वाटले होते. विचित्र लूक, मोठे डोळे, फाटलेला आवाज बघून अभिनेता होईल, हा आत्मविश्वास ढासळला होता. कारण कॅमे-यासमोर मी खूप विचित्र दिसत होते. 'जमीन से आसमान तक' हा माझा पहिला शो होता. सहारा वाहिनीवर हा शो प्रसारित झाला होता. या मालिकेत माझ्या भूमिकेचे नाव बॉबी होते.
प्र. पहिली सॅलरी किती होती आणि पहिली कार कधी आणि कोणती घेतली होती?
उ. माझी पहिली सॅलरी पाचशे रुपये होती आणि आज मी टीव्ही इंडस्ट्रीतील महागडा अभिनेता आहे. कारविषयी सांगायचे झाल्यास 'रामायण' या मालिकेनंतर मी माझी पहिली कार खरेदी केली होती. माझी पहिली कार ब्लू कलरची फोर्ड होती. ही 2008 ची गोष्ट आहे.
प्र. देबीना तुझी पत्नी आहे. तिच्यासोबत तुझी भेट कशी झाली आणि लग्नाचा निर्णय कधी घेतला?
उ. ही 2004ची गोष्ट आहे. ती माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी होती आणि आज ती माझी पत्नी आहे. तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. ती माझी ताकद आहे. हे घर तिच्यासाठीच आहे. या घरासाठी मी खूप मेहनत घेतली. मात्र माझी हिंमत नेहमीच देबीनाच राहिली. मला आठवतं, जेव्हा आम्ही पहिले घर खरेदी केले होते, तेव्हा त्याचे बांधकाम सुरु होते. आम्ही जुहू बीचवर जाऊन वाळूचे घर बनवायचो. देबीना वाळूतून स्वप्नातील घर साकारायची. हे घर अगदी तिला हवे तसेच आहे.
प्र. 'खामोशियां' हा सिनेमा कसा मिळाला?
उ. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे स्त्रीचा हात असतो. मात्र माझ्या सिनेसृष्टीतील पदार्पणामागे देबीना नव्हे, तर नीलू आंटी आहे. नीलू मुकेश भट्ट यांच्या पत्नी आहेत. त्या माझ्या शोज बघायच्या. नीलू आंटी माझ्या मोठ्या चाहत्या आहेत. मला लाँच करण्यासाठी त्यांनीच मुकेशींना सांगितले. मात्र त्यावेळी मुकेशजींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. एकेदिवशी मला साऊथ आफ्रिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तेथे मुकेशी उपस्थित होते. त्यांनी मला पाहिले आणि आठवड्याभराने फोन करुन मला बोलावून घेतले. अशाप्रकारे हा सिनेमा मला मिळाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गुरमीत चौधरीच्या घराची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर