आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faisal Khan Buys 1 Bhk Flat On 15th Floor In Mumbai

ऑटो ड्रायव्हरचा मुलगा आहे टीव्हीतील महाराणा प्रताप, मुंबईत विकत घेतला फ्लॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या मालिकेने घराघरात पोहोचलेला टीव्हीतील महाराणा प्रताप फैजल खान याने मुंबईत नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. फैजलचे वडील ऑटो चालवतात. आतापर्यंत त्यांच्या मालकिचा मुंबईत फ्लॅट नव्हता. तो मुंबईत आजीसोबत राहत होता. त्याच्या कठोर परिश्रमाला अखेर यश मिळाले. मुंबईसारख्या महागड्या शहरात त्याला फ्लॅट विकत घेता आला. 2012 मध्ये फैजलने डांसिंग रियलिटी शो 'डांस इंडिया डांस लिल मास्टर'चा दुसरा सीजन जिंकला होता. त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही. आता तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्याशी आम्ही केलेली बातचित...
स्वतःचा फ्लॅट विकत घेतला
दोन महिन्यांपूर्वी आम्ही या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. हा वनबिएचके फ्लॅट आहे. विशेष म्हणजे आम्ही 15 व्या मजल्यावर राहतो. माझ्यासाठी हा फ्लॅट विशेष आहे. मुंबईसारख्या शहरात फ्लॅट विकत घेणे काही सोपी गोष्ट नाही. यापूर्वी मी आजीच्या घरी राहत होतो. आमचे स्वतःचे घर नव्हते. मला माझा अभिमान आहे, की मी मेहनतीच्या बळावर माझ्या पालकांचे स्वप्न पुर्ण केले आहे.
फ्लॅटच्या गॅलरीबाबत
मला माझ्या फ्लॅटची गॅलरी खुप आवडते. येथून मुंबई अगदी लहान दिसते. पावसाळा आणि हिवाळ्याची मी अत्यंत आतुरतेने वाट बघत आहे. हे ऋतू या घरात मला अनुभवायचे आहेत. 15 व्या मजल्यावरुन पावसाळ्यात अत्यंत रम्य चित्र दिसत असेल याचा मला विश्वास आहे. मला फोटोग्राफिही आवडते. अशा वेळी मला सुर्योद्य कॅमेऱ्यात टिपायचा आहे.
इंटेरिअर डिझायनिंगवर
या फ्लॅटचे कलर कॉम्बिनेशन मी डिसाईड केले आहे. संपूर्ण घराला ऑफ व्हाईट आणि लॅव्हेंडर कलरने पेंट केले आहे. मी कुठे तरी वाचले आहे, की लॅव्हेंडर कलरने मनात सकारात्मक भावना येतात. सुरवातीला मला घराला ऑरेंज कलर द्यायचा होता. पण तो फार डार्क दिसला असता. त्यामुळे मी लाईट आणि पॉझिटिव्ह कलरची निवड केली आहे. घर सजवण्यासाठी मला इंटेरिअर डिझायनर हायर करायचा नव्हता. माझ्या घरच्यांनीच इंटेरिअर तयार केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, फैसल खानच्या फ्लॅटचे फोटो...