आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होर्डिंग पाहण्यासाठी आतुर फैजल खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या मालिकेत युवा महाराणाची भूमिका साकारणारा फैजल खान मुंबईला परतण्याची वाट पाहत आहे. खरे म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण महाराष्ट्रातील तालार्शी भागात होत आहे. चित्रीकरण सुरू झाल्यापासून फैजल अद्याप मुंबईला गेला नाही. त्यामुळे त्याने एकदाही मालिकेचे प्रोमोशन अभियान आणि खास करून मुंबई शहरात जागोजागी लावण्यात आलेले होर्डिंग्ज बघितले नाहीत. या होर्डिंग्जवर आपले छायाचित्र पाहण्यासाठी तो मुंबईला जाण्यासाठी आतुर झाला आहे. नववीत शिकत असलेल्या फैजलचे वडील मुंबईत ऑटोरिक्षा चालवतात. ऑडिशनद्वारे त्याची या मालिकेसाठी निवड झाली तेव्हापासून त्याच्या कुटुंबीयांचा आदर वाढला आहे.