आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous TV Show Laptaganj Comedy Artist Ramji Commit Suicide By Hanging

SAB TVच्या गाजलेल्या 'लापतागंज' मालिकेतील विनोदी कलाकाराची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'लापतागंज' मालिकेतील सहकलाकारासोबत रामजी शांडिल्य)

झाशीः रामजी शांडिल्य या टीव्ही कलाकाराने बुधवारी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. राहत्या घरी गळफास घेऊन रामजी शांडिल्यने आत्महत्या केली. शांडिल्य सब टीव्ही वाहिनीवर गाजत असलेल्या 'लापतागंज' या विनोदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. 'लापतांगज'सह अनेक मालिकांमध्ये हा कलाकार झळकला होता. सांगितले जाते, की मुंबईहून परतल्यानंतर त्याला दारुचे व्यसन जडले होते.
बुंदेलखंडस्थित उरई येथील रामनगर निवासी असलेला राम शांडिल्य काही वर्षांपूर्वी मुंबईत गेला होता. येथे बराच संघर्ष केल्यानंतर मालिकांमध्ये तो छोटेखानी भूमिका साकारु लागला होता. याच काळात त्याला सब टीव्हीच्या 'लापतागंज' या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईहून आपल्या घरी परतला होता.
मंगळवारी रात्री शांडिल्य दारुच्या नशेत घरी परतला. त्याचे वडील रामस्वरुप शांडिल्या यांना त्याची ही गोष्ट खटकली. यापुढे घरी दारु पिऊन घरी न येण्याची ताकिद त्यांनी त्याला दिली. मात्र नशेत धुंद असलेल्या रामजीने वडिलांसोबत असभ्य वर्तन केले. त्यामुळे वडिलांनी त्याला थोबाडीत मारले.
वडिलांनी मारल्यानंतर केली आत्महत्या...
वडिलांनी थोबाडीत मारल्यानंतर रामजी आपल्या खोलीत निघून गेला. थोड्यावेळात जेव्हा आई त्याच्या खोलीत गेली, तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
पुढे वाचा, अभिनयाची होती विशेष आवड...