'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोचा विचार मनात आल्यानंतर बिट्टू शर्मा, डॉली दादी, नौकर राजू, पलक, मिसेस बिट्टू यांच्यासोबतच पिंकी बुआचा चेहरादेखील आपल्या डोळ्यासमोर येतो. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये पिंकी बुआच्या लग्नाचा विषयावर बरीच गंमतीशीर चर्चा रंगते आणि तीही शोमध्ये आलेल्या प्रत्येक अभिनेत्याला लग्नाची मागणी घालते. परंतु तिच्या पदरी नेहमीच निराशा येते. मात्र आता तिच्या नवदेवाचा शोध संपला आहे असेच म्हणावे लागेल. कारण, पिंकी बुआने गोल्डन भाईसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंकी बुआच्या लग्नासाठी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोचा एक खास एपिसोड शुट करण्यात आला आहे. ज्याचे प्रसारण या महिन्यात केले जाणार आहे. पिंकी बुआच्या लग्न सोहळ्यात फरहान अख्तर आणि विद्या बालनसुध्दा सामील झाले आहेत. पिंकी बुआचे लग्न डान्सच्या धमाल-मस्तीमध्ये झाले असेच म्हणावे लागेल. कारण फरहान आणि विद्याने देखील या लग्नात डान्स केला आहे. लग्नामध्ये पिंकी बुआ खूपच सुंदर दिसत होती. तिने राखडी रंगाचा लेहंगा परिधान केलेला होता. तसेच लग्नात सामील झालेल्या विद्यानेसुध्दा राखडी रंगाचा ड्रेस घातलेला होता. फरहान अख्तरने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेली होती आणि त्यावर त्याने काळसर रंगाचे ब्लेझर घातलेले होते.
या लग्नात कपिलची दादी अर्थातच पिंकी बुआची आई खूपच दु:खी दिसत होती. तिने दु:ख कमी करण्यासाठी मद्यपान केले होते आणि नशेत बुडालेली होती. कॉमेडी नाइट्सच्या सेटवर कपिल शर्माची पत्नी मिसेस शर्मासुध्दा उपस्थित होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पिंकी बुआच्या लग्न सोहळ्यात सर्वांनी कशी धमाल मस्ती केली...