आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fight Of Comedy, Sunil Ready To Figth With Kapil !

कपिलची सुटी करायला 'चुटकी' सज्ज, मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची मिळणार साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोला टफ फाइट देण्यासाठी सुनील ग्रोवरचा 'मॅड इन इंडिया' हा शो सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या शोमुळे प्रकाशझोतात आलेला सुनील आता त्याच्या स्वतःच्या शोमध्ये 'चुटकी' हे पात्र साकारताना दिसणार आहे. प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाल्यानंतर सुनीलने कपिलच्या शोमधून काढता पाय घेतला आणि 'मॅड इन इंडिया' या नावाने तो आपला शो घेऊन छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. 16 फेब्रुवारीपासून रविवारी रात्री नऊ वाजता त्याचा हा शो स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
'मॅड इन इंडिया'चे प्रोमो टीव्हीवर सुरु झाले आहेत. या शोमध्येही सुनील स्त्री पात्र साकारणार आहे. त्याच्या स्त्री पात्राचे नाव चुटकी असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्लस आणि सुनीलने शोमधील स्त्री पात्राच्या नावावर बराच विचार करुन चुटकी हे नाव निश्चित केले. खरं तर चॅनलने सुनीलला शोसाठी 'गिगली इव्हिनिंग विथ ग्रोवर अँड गुत्थी नाइट्स' हे नाव सुचवले होते. मात्र सुनीलने यासाठी नकार दिला.
'मॅड इन इंडिया'च्या प्रोमोत 'चुटकी' (सुनील ग्रोवर) नटताना दिसत आहे. याशिवाय विनोदासाठी सज्ज होण्यास ती प्रेक्षकांना सांगतेय. सुनीलचा हा अंदाज प्रेक्षकांना आवडणार की नाही, हे तर येणा-या दिवसांत स्पष्ट होईलच. या शोद्वारे सुनील विनोदवीरांची फौज घेऊन घेऊन येतोय. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सुनीलसह या शोमधून विनोदाचे षट्कार लावताना दिसणार आहे.
सिद्धार्थशिवाय सुनीलच्या टीममध्ये आणखी कोणते विनोदवीर सामील झाले आहेत आणि गुत्थी का बनली चुटकी, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...