आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 1st डे : \'भाभीजी\' ने घेतला पंगा, तर दाऊदच्या जावयावर भडकली सपना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस' चा 11वा सिझन सुरू झाला आहे. शोच्या पहिल्या दिवशीच घरातील कंटेस्टंटमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एपिसोडमध्ये घरातील मेन सदस्यांमध्ये तर वाद झालेच पण त्याचबरोबर शेजाऱ्यांशीही तूतू मैमै झाल्याचे पाहायला मिळाले. 'भाभीजी घर पर हैं' ची भाभीजी उर्फ शिल्पा शिंदे प्रोड्युसर विकास गुप्ता पुन्हा जुन्या मुद्द्यावर भांडताना दिसले. 

सकाळीच सुरू झाले भांडण.. 
- 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या दिवशी सकाळपासूनच शिल्पा आणि विकास यांच्यात वाद सुरू झाला होता. 
- भांडणादरम्यान शिल्पा शिल्पा स्वतःबाबत स्पष्टीकरण देत होती तर विकास ती चुकीची वागल्याचा आरोप करत होता. 
- ही चर्चा एवढ्यावरच थांबली नाही तर विकासने तिला सर्वांसमोर 'सायको' आणि 'मेंटली चॅलेंज्ड पर्सन'ही म्हटले.
- घरातील इतर सदस्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर शिल्पा त्याठिकाणाहून निघून गेली. 
 
या मुद्द्यावर भांडत आहेत शिल्पा-विकास
- 'भाभीजी घर पर है' मध्ये अंगुरी भाभीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदेने प्रोड्युसर संजय कोहलीच्या विरोधात सेक्श्युअल हॅरेशमेंटचा गुन्हा दाखल केला होता. 
- हा शो 2 मार्च, 2014 ला सुरू झाला होता. तो चांगलाच प्रसिद्ध झाला. त्याचदरम्यान प्रोड्युसरवर फीस न वाढवल्याचा तसेच मेकअप आणि प्रोडक्शन हाऊसवर तिने त्रास दिल्याचा आरोप लावला. 
- शोच्या प्रोड्युसरने हॅरेशमेंट आणि इतर सर्व आरोप फेटाळत शिल्पावरच शो सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे 12.5 कोटींचा खटला दाखल केला होता. प्रोड्यूसरने हेही म्हटले होते की, शिल्पाकडे अजूनही त्यांचे 32 लाख रुपये आहेत. 
- शिल्पाने शो सोडला तेव्हा तो टॉपवर होता. त्यामुळे त्यावेळी प्रोग्रामिंग हेड असलेल्या विकास गुप्ताला मेन लीड रिप्लेस करणे आणि TRP च्या रेसमध्ये टिकण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 
- याच मुद्द्यावरून विकास आणि शिल्पा यांच्यात वाद सुरू आहेत. 

अॅडल्ट जोकमुळे दाऊदचा जावई आणि सपना चौधरीमध्ये वाद 
- सकाळच्या वेळी सर्व सदस्य बसलेले होते तेव्हा झुबेर खानने एक अॅडल्ट जोक ऐकवला. 
- त्यावर सपना चौधरी चांगलीच भडकली. तिने झुबेरला मुलींसमोर असे जोक ऐकवायचे नाही आणि भाषेवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. 
- कंटेस्टंट पुनीश शर्माही सपनाचे म्हणणे योग्य असल्याचे म्हणत झुबेरला समजावू लागला. 
- पण झुबेरने चूक मान्य न करता तो सपना आणि पुनीश यांच्यावर भडकला. दोघांमध्ये झडपही होणार होती. झुबेरने रागात शर्ट काढून फेकला. पण इतर कंटेस्टंटने मध्यस्थी करत वाद मिटवला. 

पुढील स्लाइडवर वाचा, 'बिग बॉस' ने हिना खान आणि बेनाफशा सुनावालाला दिले सरप्राइज.. 
 
बातम्या आणखी आहेत...