आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: बिकिनी अवतारात दिसली 'चंद्रमुखी चौटाला', नवीन बॉयफ्रेंडसोबत करतेय धमाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजलेल्या F.I.R. या टीव्ही शोमध्ये चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक हिने अलीकडेच इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये कविता समुद्रकिनारी बिकिनी परिधान करुन धमाल करताना दिसतेय. फोटोजला तिने कॅप्शन दिले, "Totally cliche' run but always works ! Yayy beach baby". एक व्हिडिओसुद्धा तिने यासोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड रोनित बिस्वासने शूट केले आहे. व्हिडिओत ती स्लो मोशनमध्ये धावताना आणि शेवटी फ्लाइंग किस करताना दिसतेय. याचवर्षी जुलै महिन्यात तुटले पाच वर्षे जुने नाते...

कविता कौशिक रोनित बिस्वासपूर्वी डॉन 2 आणि दिलवाले या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता नवाब शाहसोबत रिलेशनशिपमध्ये होती. याचवर्षी जुलै महिन्यात त्यांचे पाच वर्षे जुने नाते तुटले. वेगवेगळ्या धर्माचे असल्याने कविताच्या पालकांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे कविताने हे नाते पुढे नेण्याऐवजी ते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

आता जुन्या मित्राला डेट करतेय कविता...
नवाबसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 35 वर्षीय कविता तिचा जुना मित्र रोनित बिस्वासला डेट करतेय. सोशल मीडियावर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे. कविताने यावर्षी रोनितसाठी करवा चौथचा उपवाससुद्धा केला होता.

पुढील स्लाईड्सवर बघा, कविता कौशिक आणि रोनित बिस्वासचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...