(अनिता हसनंदानी, दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, अंकिता भार्गव)
मुंबईः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल 3 मे रोजी अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत विवाहबद्ध झाला. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. गेल्या 4 दिवसांपासून हे कपल लग्नाच्या विधीत व्यस्त होते. लग्नानंतर रविवारी रात्री रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती.
रिसेप्शन पार्टीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. यापैकी एका छायाचित्रात करण त्याची खरी पत्नी अंकिता भार्गव आणि 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत रिल वाइफची भूमिका साकारणा-या अनिता हसनंदानी (शगून मेहता) आणि दिव्यांका त्रिपाठी (इशिता भल्ला) यांच्यासोबत पोज देताना दिसतोय.
या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत करण आणि अंकिताच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्र उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये करण पटेलने डिझायनर जेड ब्लॅक सूट परिधान केला होता. तर अंकिताने गोल्डन कलरचा लहेंगा कॅरी केला होता.
आपल्या स्पेशल आउटफिटविषयी अंकिताने सांगितले, "गोल्डन कलरचा लहेंगा परिधान करणे ही पटेल कुटुंबाची परंपरा आहे. ती फॉलो केल्याने मी आनंदी आहेत. प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न बघत असते. आज माझे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. कारण आज मी मिसेस पटेल झाले आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या रिसेप्शन सेरेमनीची खास छायाचित्रे...