(टेली कॅलेंडरच्या शूटसाठी जॉर्डन येथे पोहोचलेल्या अभिनेत्री आणि अभिनेते समुद्रात अशी मस्ती करत आहेत.)
जॉर्डन : 2015 या नवीन वर्षासाठी टेली कॅलेंडरचे शूटिंग सुरु झाले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री यासाठी केवळ शूटिंगच करत नाहीयेत, तर फावल्या वेळेत भरपूर मजा-मस्तीसुद्धा करत आहेत. 2015 च्या कॅलेंडरवर टीव्ही अभिनेत्री क्रिस्टर डिसुजा, सारा खान, रुबीना मलिक, सृष्टी रोडे, टीना दत्ता, सुकृती कंदपाल, बरखा बिष्ट आणि सना खान यांच्या दिलखेचक अदा बघायला मिळणार आहेत. या सर्व अभिनेत्री आठवडाभर कॅलेंडरसाठी शूट करुन मुंबईत परतणार आहे.
टेली कॅलेंडरचे हे चौथे वर्ष असून यंदा जॉर्डनमधील जगातील सर्वात मोठ्या ओपन एअर स्पा आणि पृथ्वीच्या लोवेस्ट पॉईंट द डेड सीमध्ये कॅलेंडरसाठी शूटिंग केले जाणार आहे. या कॅलेंडरवर टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींसोबतच जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या पेट्राचे सौंदर्यसुद्धा दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टेली कॅलेंडरच्या शूटवेळी क्लिक झालेली निवडक छायाचित्रे...