आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्लिनला रिप्लेस करुन सनी बनली Splitsvillaची होस्ट, पाहा First Look

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोन आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. एमटीव्हीवर प्रसारित होणा-या 'स्प्लिट्सव्हिला' या शोच्या सातव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सनी सांभाळणार आहे. या शोचे सहावे पर्व शर्लिन चोप्राने होस्ट केले होते.
सनी यापूर्वी 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात छोट्या पडद्यावर दिसली होती. 'बिग बॉस'च्या घरातच पूजा भट्टच्या 'जिस्म 2' या सिनेमाची ऑफर सनीला मिळाली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. मात्र यावर्षी रिलीज झालेला 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सनीला 'स्प्लिट्सव्हिला' हा शो होस्ट करण्याची ऑफर मिळाली. निखिल चिनप्पासह सनी हा शो होस्ट करणार आहे.
'स्प्लिट्सव्हिला' हा शो 'फ्लेवर ऑफ लव' या अमेरिकन रिअॅलिटी शोच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. सनी नियमित रुपात शोच्या स्पर्धकांशी बातचित करताना दिसेल.
या शोची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करण्यात आली आहेत. या
छायाचित्रांसोबतच पाहा सनीने अलीकडेच शेअर केलेली तिची खासगी छायाचित्रे...