आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 10 : सलमान बनला अंतराळवीर, घरात दिसणार सामान्य नागरिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्धी आणि वाद दोन्ही बाबतीत आघाडीवर असणाऱ्या बिग बॉस या रियालिटी शोच्या चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण या शोच्या दहाव्या पर्वाचा पहिला प्रोमो आल्याने लवकरच हा शो टिव्हीवर दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रोमोमध्ये शोचा होस्ट सलमान खान अंतराळवीराच्या कपड्यांत दिसून आला आहे. त्यामुळे यावेळी आणखी काहीतरी खूप रंजक घडणार असल्याचे स्पष्टच आहे.

बिग बॉस सीझन टेन बिथ कॉमन वुमेन अँड मेन असे स्लोगन या प्रमोमध्ये सलमानने वापरले आहे. याचाच अर्थ यावेळी सामान्य लोकांमधून काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी कोण-कोण असणार हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. सलमान सातव्यांदा हा शो होस्ट करत आहे. चौथ्या पर्वापासून सलग आतापर्यंत सलमानच हा शो होस्ट करत आहे. सलमानमुळे शोच्या टीआरपीलाही मोठा फायदा होत असल्याचे समोर आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बिग बॉसच्या 10 व्या पर्वाचा पहिला प्रोमो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...