आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोपी बहू'ची पहिली कमाई होती 25 हजार रुपये, जाणून घ्या 18 TV स्टार्सची पहिली कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'साथ निभाना साथिया' आणि 'जीनी और जूजू' फेम अभिनेत्री जिया मानेक हिने नुकतीच वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. जियाचा जन्म 18 फेब्रुवारी 1986 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. 'साथ निभाना साथिया' या मालिकेमुळे जिया घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली 'गोपी बहू'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. महाविद्यालयीन जीवनात असताना तिने ब-याच ऑडीशन दिल्या. त्यातच तिला छोट्या पडद्यावर पहिली संधी मिळाली. जिया आत्तापर्यंत 'न घर के न घाट के', 'साथ निभाना साथिया', 'जीनी और जूजू' या मालिकांमध्ये झळकली आहे. अभिनेत्रीसोबत तिला मॉडेलच्या रुपातही ओळखले जाते. 'अमूल' आणि 'वाटिका हेयर ऑईल' या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. याशिवाय झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोमध्ये तिने आपल्या डान्सची झलकही प्रेक्षकांना दाखवली आहे.
पहिली कमाई होती 25 हजार रुपये
जियाने वयाच्या 17 वर्षी पहिली कमाई केली होती. वाटिका शॅम्पूच्या जाहिरातीत ती झळकली होती. यासाठी तिला 25 हजार रुपये मिळाले होते. जियाने आपली पहिली कमाई आपल्या वडिलांच्या हातात दिली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांची किती होती पहिली कमाई....