आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 रु. Per Hour होती Tvच्या या महाराणीची 1St सॅलरी, जाणून घ्या इतर स्टार्सची पहिली कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोनी टीव्हीवर प्रसरित होणारी 'भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप' मालिका लवकरच ऑफएअर होणार आहे. अलीकडेच या मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला. या मालिकेत अभिनेत्री हिना परमार महाराणी फूल कुंवरच्या भूमिकेत होती. तसेच हिना परमारला काही दिवसांपूर्वी झीटीव्हीवरील ऐतिहासिक शो 'जोधा अकबर'मध्ये अनारकलीच्या रुपात पाहिले जात होते. फूल कुंवरच्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. जाणून घेऊया हिनाच्या आयुष्याविषयी...
20 रुपये तास होती पहिली कमाई-
एका मुलाखतीत हिनाने तिच्या पहिला पगाराविषयी सांगितले होते. तिने सांगितले होते, 'मी 17 वर्षांची असताना कस्टमर केअर सर्व्हिसचा एक्सपीरियन्स घेण्यासाठी फ्रेंक्लिन क्लासेसला जात होते. क्लासेससमोर एक डोमिनोज आऊटलेट होते. तिथे मी तासाच्या हिशोबाने काम करत होते. माझी कमाई 20 प्रती तास अशी होती. महिन्याच्या अखेर मला पहिला चेक 1800 रुपये दिला होता.' हिनाच्या सांगण्यानुसार, तिने यातील काही पैसे वडिलांना दिले आणि काही गरजेसाठी खर्च केले.
'हार जीत' होता पहिला शो-
मुंबईची रहिवासी हिना परमार पहिल्यांदा कलर्सच्या 'हार जीत' शोमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने माहिका अर्थातच माहीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 'पुर्नविवाह', 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' आणि 'जोधा अकबर'सारख्या मालिकेत काम केले.
केवळ हिनाच नव्हे अनेक टीव्ही कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्या कमाईविषयी सांगितले आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमच्या लाडक्या टीव्ही स्टार्सची पहिली कमाई...