आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या घरात वास्तव्याला आहे डान्सर सपना, पहिल्यांदा बघा घराचे INSIDE PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बहादुरगड/पानीपत- हरियाणीची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून तिच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. सपनाची आई नीलम चौधरी यांनी सपनाच या शोची विजेती ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  नीलम चौधरी यांनी divyamarathi.com सोबत सपनाशी निगडीत काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
- सपना चौधरी दिल्लीजवळील नजफगडच्या दीनपूर कॉलोनीत वास्तव्याला आहे.
- येथे सपनाचे स्वतःचे घर आहे. तिच्या घरी आई नीलम चौधरी आणि भाऊ करण चौधरी आहेत. सपनाच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न झाले आहे.


ड्रॉइंग रूममध्ये बनवले आहे ऑफिस
- सपनाने तिच्या ड्रॉइंग रुममध्येच आपले ऑफिस थाटले आहे. ड्रॉइंग रुमध्ये सोफा आणि टेबल ठेवण्यात आला आहे.
- येथेच सपनाच्या कार्यक्रमांचे बुकिंग केले जाते.
- ड्राइंग रूमच्या शेजारी सपनाची बेडरुम आहे. या बेडरुममध्ये सपनाचा मोठा फोटो लावला आहे.
- ग्राउंड फ्लोअरवर भाऊ करण आणि आई नीलम चौधरी यांची बेडरुम आहे.
- घराच्या ग्राउंड फ्लोअरवर किचन आहे.


खाण्यात शाही पनीर आहे सपनाला पसंत
- आई नीलम चौधरी यांनी सांगितल्यानुसार, सपनाला खाण्यात शाही पनीर अधिक पसंत आहे.
- विशेष म्हणजे स्वतः सपना उत्कृष्ट कुक आहे. 
- सपनाच्या घरी दोन नोकर कामाला आहेत.


सपनाजवळ आहे इनोव्हा गाडी...
- सपनाजवळ स्वतःची इनोव्हा गाडी आहे.
- नीलम चौधरी यांनी सांगितल्यानुसार, सपना कार्यक्रमस्थळी आयोजकांच्या नव्हे तर स्वतःच्या गाडीतून जाणे पसंत करते.
घराबाहेर लागले आहे वोट अपील करणारे बोर्ड...
- सपनाला बिग बॉसचा विजेता करण्यासाठी तिच्या आई आणि भावाने घराबाहेर वोट अपील करणारा बोर्ड लावला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, सपना चौधरीच्या घराचे इनसाइड फोटो... 

बातम्या आणखी आहेत...