आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fitness Secrets Of Nirbhay Wadhwa The Hanuman Of Television

परफेक्ट बॉडीसाठी जिममध्ये असा घाम गाळतोय TVचा हनुमान, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोनी टीव्हीच्या लोकप्रिय होत असलेल्या 'संकट मोचन महाबली हनुमान' या मालिकेमध्ये हनुमानचे पात्र साकारणारा निर्भय वाधवा पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी शरीरयष्टीवर विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी तो केवळ डायटच नव्हे तासन् तास जिममध्ये वर्कआऊटदेखील करत आहे. divyamarathi.comशी झालेल्या मुलाखतीत परफेक्ट बॉडीसाठी तो कशी एक्सरसाइज करत आहे, हे सांगितले.
तो सांगतो, 'हनुमानच्या पात्रासाठी जशी बॉडी हवी आहे, त्यासाठी मी जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी मी अनेक तास वर्कआऊट करत आहे, त्यात मी जखमी होण्याचीसुध्दा भिती आहे. मी जे स्कॉट्स करतो ते 200KGच्या जवळपास असतात. त्यामध्ये माझे ट्रेनर मला बदत करतात.' निर्भयने यादरम्यान आपले डायट प्लानसुध्दा शेअर केला. त्याने सांगितले, 'मला संपूर्ण दिवस जेवण करावे लागते. त्यामध्ये प्रोटीन्स, सप्लीमेंट्स आणि अमीनो अॅसिडसारखे अनेक तत्व त्यात सामील असतात. सध्या मी मांसाहार खाणे बंद केलय, त्यामुळे प्रोटीन्सचे प्रमाण कमी झाले आहे.'
डायटबाबत अशी आहे निर्भयची दिनचर्या-
निर्भयच्या सांगण्यानुसार, त्याची दिनचर्या सकाळी चार वाजता सुरु होते. प्री वर्कआऊट (सप्लीमेंट्स) घेऊन तो 5 वाजता जिममध्ये पोहोचतो. येथे दीड ते दोन तास एक्सरसाइज करतो. त्यानंतर तो घरी जाऊन सफरचंद आणि ओट्स खातो. सोबतच भिजलेले सोयाबिन आणि बदामसुध्दा खातो. त्यानंतर दोन तासांनी तो भात आणि स्वीट पोटॅटो आणि पुन्हा दोन तासांनी ज्यूस किंवा ब्रोकली, संध्याकाळी चार वाजता प्रोटीन शेक आणि दोन केळी, सोबत एखाद्या फळाचा ज्यूस आणि रात्री कॅसीन नावाचे सप्लीमेंट आणि एक मिल्क रिप्लेसमेंट चॉकलेट घेतो. अशाप्रकारे संपूर्ण दिवस त्याचे काही ना काही खाद्य सुरुच असतेय शिवाय दररोज 8-10 लीटर पाणीसुध्दा प्यावे लागते. ड्रायफ्रूट्स आणि दूधसुध्दा त्याच्या दररोजच्या डायटमध्ये समील आहे.
मसल्ससाठी पाणी खूप गरजेचे-
निर्भयच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला मसल्स बनवायचे असतील तर डायटवर विशेष लक्ष द्यावे लागते. त्यासाठी जास्तित जास्त पाणी गरजेचे असते. शिवाय कमीत कमी 12 प्रकारचे फळ दिवसभर खावे लागतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निर्भय वाधवाच्या जिम अॅक्टीव्हिटीजचे काही फोटो...