(श्रींचे दर्शन घेताना अभिनेत्री सोफी चौधरी)
मुंबई - 'झलक दिखला जा-7' या डान्सिंग रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलेली अभिनेत्री, गायिका आणि माजी व्हीजे सोफी चौधरी मुंबईतील ग्रॅण्ट रोड (ईस्ट) स्थित लोढा गणपतीच्या दर्शनाला पोहोचली होती.
dainikbhaskar.comशी बोलताना सोफी म्हणाली, ''येथे मी श्रींच्या दर्शनाला आली आहे. येथे येऊन मन प्रसन्न झाले. मी धार्मिक मुलगी आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. मला आशा आहे, की ते मला आनंदी ठेवतील आणि सर्व अडचणी दूर करतील. पहिल्यांदाच मी येथे आले असून मुंबईतील इतर मंडळातील गणपतीच्या दर्शनालासुद्धा मी जाणार आहे.''
यावेळी सोफीने रिद्धी मेहराने डिझाइन केलेला निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गणेशाचे दर्शन घेतानाची सोफीची निवडक छायाचित्रे...