आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 44व्या वर्षी अविवाहित आहे आमिरची \'पत्नी\', पस्तीशी ओलांडलेल्या या अॅक्ट्रेसेस आहेत सिंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खान स्टारर 'दंगल' या सिनेमात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनत्री साक्षी तंवरने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 'कहानी घर घर की' या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या साक्षीचा जन्म राजस्थानच्या अलवर शहरात 12 जानेवारी 1973 रोजी झाला. साक्षीचे वडील राजेन्द्र सिंह तोमर रिटायर्ड सीबीआई ऑफिसर आहेत. टेलिव्हिजनसोबतच साक्षी आता बॉलिवूड सिनेमांमध्येही काम करते.  
 
अँकरिंगद्वारे केली करिअरची सुरुवात 
साक्षीने तिच्या करिअरची सुरुवात दुरदर्शवर प्रसारित झालेल्या 'अलबेला सुर मेला' या सांगितिक कार्यक्रमाच्या अँकरिंगच्या रुपात केली होती. यासाठी साक्षीने ऑडिशन दिली होती. त्यानंतर 1996 मध्ये टीव्ही शो 'दस्तूर'द्वारे तिने स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री घेतली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेतून. पुढे तिने 'देवी', 'बालिका वधू', 'क्राइम पेट्रोल', 'बडे अच्छे लगते है' या मालिकांमध्ये झळकली. 20 वर्षांच्या करिअरमध्ये साक्षीने ब-याच अनेक सिनेमांमध्ये काम केले. 'कॉफी हाउस', 'बावरा मन', 'सलून', 'कहीं दूर', 'मौहल्ला अस्सी' आणि 'दंगल' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 

अद्याप अविवाहित आहे साक्षी... 
ऑनस्क्रिन पत्नी, आई आणि सूनेचे पात्र साकारणारी साक्षी रिअल लाइफमध्ये अद्याप अविवाहित आहे. आपल्या लग्नाविषयी साक्षी म्हणते, 'जेव्हा जे व्हायचे आहे, ते होईल. आपल्यासाठी देवच सर्व ठरवतो. आपल्याला फक्त तसे वागायचे असते.' साक्षीला 'कहानी घर घर की' मालिकेने सूनेच्या रुपात लोकप्रियता मिळवून दिली, त्यानंतर 'बडे अच्छे लगते है'ने तिला पत्नी आणि आईची भूमिका साकारली. प्रोफेशनल लाइफमध्ये बिझी असलेल्या साक्षीचे चाहतेसुध्दा तिच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, जाणून घ्या वयाची पस्तीशी आणि चाळिशी ओलांडूनही अद्याप सिंगल असलेल्या अभिनेत्रींविषयी...