आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मॅड इन इंडिया'च्या सेटवर पोहोचले 'गँग्स ऑफ घोस्ट्स'चे स्टार्स, PICSमध्ये बघा त्यांची धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जरा विचार करा एखाद्या कॉमेडी शोच्या सेटवर भूत आले तर काय होऊल? काही असो पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे ते साधन नक्कीच ठरतील. अलीकडेच असे काही दृश्य बघायला मिळाले, तेही 'मॅड इन इंडिया' या कॉमेडी शोच्या सेटवर. इथे एक भूत नव्हे तर भूतांची मोठी टोळीच आली होती. पण तुम्ही घाबरू नका कारण हे काही खरे खुरे भूत नव्हते. हे तर 'गँग्स ऑफ घोस्ट्स'चे भूत होते.
या स्टार्समध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, शर्मन जोशी आणि माही गिल सामील होते. आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेल्या या स्टार्सनी चुटकी आणि शोचा होस्ट मनीष पॉलसोबत खूप धमाल-मस्ती केली. सोबतच कॉमेडी करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनसुध्दा केले.
'गँग्स ऑफ घोस्ट्स' हा एक पॅरानॉर्मल कॉमेडी सिनेमा असून त्याचे दिग्दर्शन सतीश कौशिकने केले आहे. सिनेमात चंकी पांडे, राजपाल यादव, शर्मन जोशी आणि माही गिल यांच्याव्यतिरिक्त दक्षिण भारतीय अभिनेत्री मीरा चोप्रासुध्दा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'मॅड इन इंडिया'च्या सेटवर पोहोचलेल्या 'गँग्स ऑफ घोस्ट्स'च्या स्टार्सची काही छायाचित्रे...