आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम असल्याने घरच्यांनी केला लग्नाला विरोध, मग कुशालने केले गोहरसोबत ब्रेकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री गौहर खान आज तिचा 34 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 23 ऑगस्ट 1983 रोजी पुण्यात जन्मलेल्या गौहरने तिचे शिक्षण करताना मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. 2009 साली गौहरने 'रॉकेट सिंग-सेल्समन ऑफ द इअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'इश्कजादे', 'ब्रदीनाथ की दुल्हनिया', 'बेगम जान' या चित्रपटातही अभिनयाची चुणूक दाखविली. पण या सर्वांहूनही जास्त प्रसिद्धी गौहरला मिळाली ती बिग बॉस या शोद्वारे. 
 
बिग बॉस 7' मध्ये गौहरने स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. या शोची विनही गोहरच ठरली होती. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती गौहर आणि शोमधील स्पर्धक कुशाल टंडनच्या अफेअरची. या शोमध्ये कुशालने खुलेआम त्याचे गौहरवर प्रेम असल्याचे कबुल केले होते. इतकेच नाही तर बिग बॉस शोदरम्यान आलेल्या प्रत्येक संकटांचा दोघांनी मिळून सामना केला. यानंतर प्रत्येक कपलसाठी कुशाल-गौहर रोल मॉडेल ठरले होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधान आले होते. 

अनेक व्हॅकेशनवर गेले सोबत 
कुशाल टंडन आणि गौहर खान हे शो संपल्यानंतर वेगळेच होतील अशी बऱ्याच जणांना शंका होती. पण या दोघांचे कुठल्याही कार्यक्रमांना सोबत असणे, व्हॅकेशनवर सोबत जाणे यांसारख्या गोष्टींनी यांची बाँडींग किती छान आहे असे सर्वांनाच वाटत होते. गौहरच्या घरच्यांनीही गौहर म्हणेल त्यावेळी आम्ही पुढच्या गोष्टीबाबत विचार करु असे सांगून टाकले होते. 
आली ब्रेकअपची बातमी..
 अभिनेता कुशालने जवळपास दीड वर्ष गौहरसोबत रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर तिच्यासोबत ब्रेकअप झाल्याचे ट्वीटरवर जाहीर केले होते. एका मुलाखतीवेळी कुशालने मी आणि गौहर कधीही मित्र बनू शकणार नाही असेही म्हटले होते. यानंतर चिडलेल्या गौहरने त्याच्यावर कमेंट केले होते. 
 
 धार्मिक कारणाने वेगळे झाल्याचे सांगितले कुशालने..
 ब्रेकअपनंतर कुशालने या गोष्टीबाबत खुलासा केला की त्याचा आणि गौहरचा धर्म वेगळा असल्याकारणाने दोघांचा ब्रेकअप झाला. गौहर मुस्लिम आहे तर कुशाल पंजाबी. मुस्लिम मुलीला घराची सून स्वीकारण्यास कुशालची आई राजी नसल्याने कुशालने गौहरपासून दूर राहणे पसंत केले. अशाप्रकारे या लव्हस्टोरीचा अंत झाला. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, गौहर आणि कुशालचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...