आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Model And A Fashion Designer Diandra Is Having Lots Of Fun In Bigg Boss

BIGG BOSSच्या घरात गर्भवती झालेली डिआंड्रा खासगी आयुष्यात आहे बिनधास्त, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डिआंड्रा सोरेस)

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस शोमध्ये नेहमीच काही तरी विचित्र घडल्याचं आपण पाहतो. यावेळीही असंच काहीसं घडल्याची माहिती कळतेय. बिग बॉस सिझन 8ची एक स्पर्धक चक्क प्रेग्नेंट झाल्याची चर्चा आहे. आम्ही बोलतोय ते डिआंड्रा सोरेसबद्दल. याच आठवड्यात डिआंड्रा सोरेस बिग बॉसच्या घरातून आऊट झालीय. पण त्यापूर्वीच ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू झाली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिआंड्राला जेव्हा डॉक्टरकडे चेकअपसाठी नेण्यात आले त्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याचे कळले. डिआंड्रा शोदरम्यान गौतम गुलाठीसोबत गुटरगु करताना आढळली होती. दरम्यान, शोमधून आऊट झालेल्या डिआंड्राने मात्र आपण प्रेग्नेंट नसल्याचे म्हटलेय. शिवाय 'किस केल्याने कुणी प्रेग्नेंट होत नाही', असेही तिने म्हटले आहे.
असो,
आता सत्य काय हे तर डिआंड्राच ठाऊक. बिग बॉसमध्ये सहभागी होऊन खळबळ उडवणारी डिआंड्रा खासगी आयुष्यात खूपच बिनधास्त आहे. हे तिच्या छायाचित्रांवरुन दिसून येत आहे. डिआंड्राविषयीची खास माहिती पुढीलप्रमाणे...
मॉडेलिंग करिअरः
वयाच्या 13व्या वर्षी डिआंड्राने मॉडेलिंग जगतात पदार्पण केले. तिच्या कुटुंबीयांचा फॅशन इंडस्ट्रीशी काहीही संबध नाहीये. 1995 मध्ये मिस बॉम्बे ठरलेली डिआंड्रा अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमध्येही तिने आपला सहभाग नोंदवला आहे.
अभिनय करिअरः
डिआंड्राने अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे. जादू आणि बाली ब्रमभट्टचे रिमिक्स, जलवा हे तिचे गाजलेले अल्बम्स आहेत. 'एव्हरीबडी सेज आयएम फाइन' या इंग्रजी सिनेमाद्वारे तिने सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण केले. हा सिनेमा राहुल बोसने दिग्दर्शित केला होता. विशेष म्हणजे 'बूम' या सिनेमा कतरिना कैफने साकारलेली भूमिका सर्वप्रथम डिआंड्राला ऑफर करण्यात आली होती. मात्र तिने ती भूमिका स्वीकारली नव्हती. डिआंड्रा मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' सिनेमात झळकली आहे.
बाल्ड मॉडेलः
डिआंड्राने आपल्या करिअरमध्ये बाल्ड (टक्कल) मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. सुरुवातीला डिआंड्राच्या या बोल्ड स्टेपला अनेकांनी नापसंत केले होते. मात्र नंतर तिचा हा लूक फॅशन वर्ल्डमध्ये बराच प्रसिद्ध झाला. अनेक डिझायनर्सची डिआंड्राला पहिली पसंती असते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिनधास्त स्वभावाच्या डिआंड्राची खास छायाचित्रे...