आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gautam Gulati Kissing Pictures For MTV’s New Show, MTV Big F.

'Bigg Boss'चा विजेता गौतम हॉट तरुणीसोबत आढळला लिपलॉक करताना, PICS व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा विजेता गौतम गुलाटी आपल्या कूल लूकमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. बिग बॉसच्या घरात त्याची आणि डियांड्राची लव्ह स्टोरी बरीच चर्चेत होती. मात्र घरातून बाहेर पडताच या दोघांना एकमेकांकडे जणू पाठच फिरवली. म्हणूनच तर गौतम आता डियांड्रासोबत नव्हे तर दुस-याच तरुणीसोबत दिसला. इतकेच नाही तर तो चक्क तिच्यासोबत लिपलॉक करताना आढळला. आता हा खासगी आयुष्यात दुस-या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असेच तुम्हाला वाटले असेल नाही का... मात्र हा लिपलॉक त्याच्या एका नवीन शोचा भाग आहे.
गौतम लवकरच एमटीव्ही वाहिनीवर 'बिग एफ' नावाचा शो घेऊन येतोय. या शोच्या प्रोमोमध्ये तो एका तरुणीला किस करताना दिसतोय. बिग बॉस वगळता हा गौतमचा पहिलाच ऑन स्क्रिन किस आहे. गौतमने सांगितले, ''एक कलाकार म्हणून मी नवनवीन आव्हानांच्या शोधात असतो. अभिनेता म्हणून अनेक शोज आणि एक रिअॅलिटी शो केल्यानतंर मी अँकरिंगच्या प्रतिक्षेत होते. चॅनलने मला बिग एफच्या रुपात ही संधी मिळवून दिली.''
गौतमने पुढे सांगितले, ''अलीकडेच या शोच्या प्रोमोचे शूटिंग मी केले. यामध्ये मी पहिल्यांदा ऑनस्क्रिन किस करताना दिसणारेय. या शोमध्ये लोकांच्या फँटसीजविषयी सांगितले जाणार आहे. संकल्पनेनुसार हा शो खूप वेगळा आहे. यापूर्वी टीव्हीवर अशा प्रकारचा शो आलेला नाहीये.''
पुढे पाहा, गौतमची खास छायाचित्रे...