आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लबमध्ये मद्यधुंद अवस्थेत तरुणींसोबत डान्स करत होता सुशांत, गर्लफ्रेंडने लगावली कानशिलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत सिंह राजपूत आणि गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे)
मुंबईः मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या सुशांत सिंह राजपूतला त्याच्या गर्लफ्रेंडने पुन्हा एकदा कानशिलात लगावल्याची बातमी आहे. सुशांत गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
असे म्हटले जाते, की सुशांत आणि अंकिता 22 एप्रिल रोडी मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी सुशांतने बरीच दारु प्यायली आणि तेथे उपस्थित काही तरुणींसोबत डान्स केला. हे बघून अंकिताचा चांगलाच पारा चढला. तिने सुशांतला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आवरत नसल्याचे पाहून तिने सर्वांसमोर सुशांतच्या कानशिलात लगावली.
तसे पाहता, सुशांत आणि अंकिताच्या बाबतील अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडतेय, असे नाहीये. काही वर्षांपूर्वी यशराज स्टुडिओतसुद्धा अंकिताने सुशांतला मारले होते. मात्र नंतर तिने या गोष्टीचा इंकार केला होता.
सुशांत आणि अंकिता गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी दोघांनी लग्न केल्याचीही बातमी आली होती. टीव्ही अभिनेत्री अंकिता झी टीव्हीवरील गाजलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. तर सुशांतनेसुद्धा या मालिकेद्वारे करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला. ‘काई पो छे’, ‘शुद्ध देशी रोमांस’ आणि ‘डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी’ या सिनेमांमध्ये सुशांतने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची निवडक छायाचित्रे...