(फाइल फोटोः सोनारिका भदौरिया)
मुंबईः लाइफ ओके वाहिनीवर गाजलेल्या 'देवों के देव महादेव' या पौराणिक मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया लवकरच तेलगू सिनेमात लीड अॅक्ट्रेसच्या रुपात झळकणार आहे. सिनेमाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र हा सिनेमा 'sundarapandian' या तामिळ सिनेमाचा रिमेक असेल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनारिकाने गेल्या रविवारी हा सिनेमा साइन केला असून लवकरच त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या सिनेमात सोनारिकाच्या अपोझिट भीमानेनी श्रीनिवास राव असेल. भीमानेनी प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे.
सोनारिकाने 2012 ते 2013 या काळात लाइफ ओकेवर प्रसारित झालेल्या 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका वठवली होती. या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
सोनारिकाचे प्रोफाइल
जन्म : 3 डिसेंबर, 1992
स्थान : मुंबई, महाराष्ट्र
प्रोफेशन : अॅक्टिंग, मॉडेलिंग
डेब्यू सीरियल : 'तुम देना साथ मेरा' (2011, लाइफ ओके)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'देवों के देव महादेव' या मालिकेतील पार्वती उर्फ अभिनेत्री सोनारिका भदौरियाचा ग्लॅमरस अवतार, ही छायाचित्रे सोनारिकाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत...