आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तरुणी आहे \'खतरों की खिलाडी\', IPLमध्ये दाखवले होते ग्लॅमर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'फियर फॅक्टर - खतरों के खिलाडी' स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो कलर्स वाहिनीवर सुरु आहे. धोकादायक स्टंट्ससोबतच शोमध्ये स्पर्धकांच्या एलिमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली आहे. या आठवड्यात प्रसिद्ध मॉडेल आणि इंडियन प्रीमिअर लीगची होस्ट रोशेल मारिया राव या शोमधून एलिमिनेट झाली आहे. या शोमधून बाहेर पडणारी रोशेल दुसरी स्पर्धक आहे. यापूर्वी 'मन की आवाज प्रतिज्ञा' फेम पूजा गौर गेल्या आठवड्यात शोमधून एलिमिनेट झाली होती.
रोशेलने 2012मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावी केला होता. 'खतरों के खिलाडी'मध्ये झळकण्यापूर्वी रोशेल 'झलक दिखला जा'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे सहभागी झाली होती. खतरों के खिलाडीमध्ये आपला सहभाग नोंदवून रोशेलने सिद्ध केले, की ती केवळ सुंदरच नाही तर निडरसुद्धा आहे.
कोण आहे रोशेल -
1980मध्ये चेन्नईत जन्मलेली रोशेल मारिया राव मॉडेल आणि अँकर आहे. तिचे वडील डॉ. एन वी राव वकिल आहेत. रोशेलने चेन्नईतील एम.ओ.पी. वैष्णव कॉलेज फॉर वुमन येथून इलेक्ट्रॉनिक मीडियात बी. एससी केले आहे. तिला फोटोग्राफीची आवड असून चेन्नई युनिव्हर्सिटीमधून तिने फोटोग्राफीतही पदवी प्राप्त केली आहे.
2012मध्ये ब्युटी क्वीनचा किताब -
रोशेल कॉलेज जीवनातच मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. 2012मध्ये तिने फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला आणि मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावी केला. यापूर्वी तिने जानेवारी 2012मध्ये फेमिना मिस इंडिया (साऊथ) या सौंदर्य स्पर्धेतही आपला सहभाग नोंदवला होता. येथे ती फस्ट रनरअप ठरली होती.
2013मध्ये आयपीएलची होस्ट -
फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावी केल्यानंतर 2013मध्ये ती आयपीएल सिझन 6ची होस्ट म्हणून आपल्या भेटीला आली. मॅचनंतर होणारा एक्स्ट्रा इनिंग हा कार्यक्रम तिने होस्ट केला होता. टीव्ही शो आणि इवेंट्समध्ये झळकलेली रोशेल आता लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीला लागली आहे.
'खतरों के खिलाडी' या शोमध्ये तुम्ही रोशेलने केलेले धोकादायक स्टंट बघितले असतील. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रोशेलची मॉडेलिंग आणि IPL-6च्या दरम्यानची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
रोशेलची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...