आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता..'च्या बालकलाकाराला दहावी बोर्डात मिळाले 82%, परिक्षेदरम्यानही सोडली नाही शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील बालकलाकार समय शाहने दहावीच्या परिक्षेत 82% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. समयने यावेळी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले की, त्याला इतके चांगले गुण मिळतील असा विचारही केला नव्हता. 
 
समयने सांगितले की त्याने जसा अभ्यास केला होता त्यावरुन त्याला 70 टक्के मिळतील अशी त्याची अपेक्षा होती पण जेव्हा त्याला त्याचे मार्क समजले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. विशेष म्हणजे, परिक्षेदरम्यानही समयने शूटिंग सोडली नाही..
समयने सांगितले की, परिक्षेदरम्यानही शूटिंग करत असल्याने तो सेटवर पुस्तक घेऊन यायचा आणि तेथेच अभ्यास करायचा. त्याच्या कष्टाचे फळ मिळाल्याने समय फार आनंदात आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अभिनयाला फर्स्ट लाईफ मानतो समय..
बातम्या आणखी आहेत...