आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत येथे राहते 'गोपी बहू', बघा घराचे INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः घराघरांत गोपी बहूच्या नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री जिया माणिक दीर्घ काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. याचवर्षी एप्रिल महिन्यात एका मीडिया हाऊसने दावा केला होता, की जिया पुन्हा एकदा 'साथ निभाना साथिया' या मालिकेत कमबॅक करु शकते. मात्र असे काही घडले नाही. रिपोर्ट्सनुसार, सध्या जियाकडे काहीच काम नाहीये. ती मुंबईतील मलाड स्थित एका अपार्टमेंटच्या 16 व्या मजल्यावरील 2 बीएचके अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे.

3 वर्षांपूर्वी खरेदी केला फ्लॅट...
रिपोर्ट्सनुसार, जियाने आपले ड्रीम हाऊस 2013 मध्ये खरेदी केले होते. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, "मी पूर्वी मीरा रोडस्थित एका वन बीएचके फ्लॅटमध्ये राहात होती. मोठे घर खरेदी करण्याचे माझे स्वप्न होते. अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आहे." जियाने सांगितले, की नवीन घरात दोन बेडरुम असून त्यापैकी एक तिच्या आईवडिलांसाठी रिझर्व आहे.

अखेरची 'जीनी और जीजू'मध्ये दिसली होती जिया...
'साथ निभाना साथिया' या मालिकेत जिया गोपी बहूच्या भूमिकेत झळकली होती. त्याच काळात तिला 'लक दिखला जा 5' या शोची ऑफर मिळाली. जियाने हा शो स्वीकारल्यामुळे तिला 'साथ निभाना साथिया' मालिकेतून काढण्यात आले. अखेरची ती 'जीनी और जूजू' या विनोदी मालिकेत अली असगरसोबत दिसली होती. मात्र हा शोसुद्धा लवकरच बंद पडला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, जियाच्या घराचे खास Photos...
बातम्या आणखी आहेत...