आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे गोविंदाची भाची, दिग्दर्शकासोबत अफेअर असल्याची स्वतः दिली होती कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता गोविंदाची भाची आहे सौम्या सेठ. इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करुन सोशल मीडियावर चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींपैकी सौम्या एक आहे. 17 ऑक्टोबर 1989 रोजी बनारसमध्ये तिचा जन्म झाला. सौम्याने दिग्दर्शक अरुण कपूरसोबत अफेअर असल्याची कबुली दिली होती. याचवर्षी जानेवारी महिन्यात सौम्या आणि अरुण कपूर यांनी यूएसमध्ये लग्न थाटले. 

मामा गोविंदाच्या डान्सवर फिदा आहे सौम्या...  
सौम्या तिचे मामा गोविंदाच्या डान्सवर फिदा आहे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ स्टारर आगामी 'जग्गा जासूस' या सिनेमात गोविंदा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. येत्या 14 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. सौम्यासुद्धा मामाप्रमाणेच उत्कृष्ट डान्सर आहे. तिने न्यूयॉर्कच्या फिल्म अॅकेडमीतून अभिनयाचे धडे गिरवले आहे. 'ओम शांति ओम' (2007) या सिनेमात एका छोट्या भूमिकेत ती झळकली होती.
 
2011 साली 'नव्याः नई धडकन नए सवाल' या मालिकेद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. ही मालिका जून 2012 मध्ये ऑफ एअर झाली होती. या मालिकेतील सौम्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर ती 'वी द सीरियल' (2012), 'दिल की नजर से खूबसूरत' (2013) या टीव्ही शोजमध्ये झळकली. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' (2016) या मालिकेतील कौरवकीच्या भूमिकेतून सौम्याला लोकप्रियता मिळाली. तिला 'नव्या' या मालिकेतील भूमिकेसाठी बिग टेलिव्हिजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय याच मालिकेसाठी तिला इंडियन टीव्ही अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. रागिणी खन्ना, अमित खन्ना आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक सौम्याचे कजिन्स आहेत. 

पुढील स्लाईड्सवर बघा, सौम्याचे 7 ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...