आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका एपिसोडसाठी 'शकुनी मामा' यांना मिळायचे 3000 रुपये, आता करताय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही मालिका महाभारतध्ये 'शकुनी मामा' नावाच्या भू्मिकेने प्रसिद्ध झालेले गुफी पेंटल सध्या कलर्स वाहिनीवरील शो 'कर्मफल दाता शनी' मध्ये नानाश्रीची भूमिका करत आहेत. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी 'महाभारत' मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना महाभारत मालिकेच्या एका भागासाठी  3000 रुपये मिळत असत. इंजिनीअर असलेल्या गुफी यांनी जॉब सोडून मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. त्यांनी  'महाभारत' असिस्टेंट डायरेक्टर म्हणून सुरु केले होते. त्यानंतर त्यांना शकुनी मामाचा रोल ऑफर करण्यात आला. त्यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी आमच्या प्रतिनीधींशी शेअर केल्या. 
 
अनेक मालिकांमध्ये केले काम..
डायरेक्टर बीआर चोप्रा यांच्या एपिक टीवी ड्रामा 'महाभारत'मध्ये 'शकुनी मामा'चा रोल करुन फेमस झालेले गुफी पेंटल यांनी नंतर अनेक मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. गुफी यांनी सांगितले की, "हा रोल केल्यानंतर माझ्यावर फार टीका होईल असे मला वाटले होते. सुरुवातीला मी ही भूमिका करण्यास थोडा घाबरलो होते पण माझे काम लोकांना आवडले आणि याचमुळे मला नंतरही काम मिळत गेले."
 
इंजिनीअर आहेत गुफी..
"अभिनेता होण्याअगोदर मी जमशेदपूर येथून इंजिनीअरींगचे शिक्षण घेतले. मी जिथे जॉब करत होतो त्यानंतर माझे ट्रांसफर मुंबईला करण्यात आले. तिथे मला 7000 पगार मिळत असे पण मला त्यात आनंद मिळत नसे. याचमुळे मी जॉब सोडला आणि मॉडेलिंग करु लागलो. मी अनेकजणांकडे असिस्टंट म्हणूनही काम केले. त्यातीलच एक होते बीआर चोप्रा." 
 
100 हून अनेक प्रकारच्या केल्या भूमिका...
गुफी यांनी सांगितले की, "2 ऑक्टोबर, 1988 साली महाभारताचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला आणि 24 जून 1990 रोजी शेवटचा अपिसोड प्रदर्शित झाला. मी महाभारताच्या जवळपास 94 एपिसोडमध्ये काम केले." गुफी यांनी भिखारीपासून माइथोलॉजिकल कॅरेक्टरपर्यंत जवळपास 100 हून जास्त प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. 
 
पत्नीचे झाले निधन..
गुफी यांच्या पत्नीचे 1993 साली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना एक मुलगा आहे ज्याचे लग्न झाले आहे. गुफी सध्या 'कर्मफल दाता शनी' मध्ये काम करत आहेत. त्यांनी एका राजस्थानी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, गुफी यांचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...