बॉलिवूडच्या आगामी 'गुंडे' या सिनेमाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अगदी आठवड्याभरावर सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर मेन ली़डमध्ये आहेत.
'इंडियाज गॉट टॅलेंट', 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोजमध्ये आपल्या सिनेमाचे प्रमोशन केल्यानंतर गुंडेची टीम पोहोचली 'बुगी वुगी'च्या सेटवर. येथे आल्यानंतर स्टार्सनी खूप धमाल-मस्ती केली. 'बुगी वुगी'च्या सेटवर एन्ट्री घेताना या तिघांनीही धमाकेदार डान्स केला. यावेळी रणवीर आणि अर्जुन जीन्स-टीशर्टमध्ये तर प्रियांका ब्लॅक टॉप आणि प्रिंटेड कॉश्च्युममध्ये दिसली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बुगी वुगीच्या सेटवरील अर्जुन, रणवीर आणि प्रियांकाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टार्सच्या डान्स परफॉर्मन्सची खास झलक...