मुंबई. 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'चा शेवटचा एपिसोड रविवारी प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये अक्षय कुमार दिसणार आहे. शोची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये 'गुत्थी' अर्थातच सुनील ग्रोवर रडताना दिसत आहे. शोचे इतर कलाकार आणि प्रेक्षकांत बसलेले लोकसुध्दा भावूक झालेले दिसत आहेत. 'कॉमेडी नाइट्स...' शो 22 जून 2013ला सुरु झाला होता.
काय आहे या व्हिडिओमध्ये...
- शेवटच्या एपिसोडचे शूटिंग 9 जानेवारीला झाले होते. व्हिडिओनुसार, जेव्हा चाहत्यांनी 'गुत्थी'ला तिचे सिग्नेचर गाणे 'हम आए है इस बगिया मे' गाण्याची अपील केली तेव्हा ती भावूक झाली. नंतर तिने लोकांचा म्हणणे मानले.
- गुत्थीने चाहते आणि प्रेक्षकांना सांगितले, 'इतके प्रेम केल्याबद्ल आभार. मी हे सर्व खूप मिस करेल. हा माझ्या आयुष्या सर्वात चांगला काळ होता. मला माहित नाही, आता हा शो पुन्हा परत येईल की नाही.'
- या शेवटच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार 'एअरलिफ्ट' सिनेमा प्रमोट करण्यासाठी येणार आहे.
सिध्दू म्हणाले, 'मरेपर्यंत सोडणार नाही कपिलची साथ'
- अक्षयने जेव्हा कपिलला विचारले, की आता सिध्दूजीची आठवण येईल आणि त्यांना त्यांचे शेर ऐकवायचे असतील तर काय कराल?
- कपिलने सांगितले, 'आम्ही दोघे एकाच शहरात राहतो. जेव्हा भेटण्याची इच्छा होईल तेव्हा जाईल त्यांच्या घरी.'
- परंतु सिध्दू यांनी कपिलचे मन जिंकले. सिध्दू म्हणाले, 'मी याचा हात पकडला आहे आणि मरेपर्यंत साथ सोडणार नाही.'
काय आहे कॉमेडी नाइट्स बंद होण्याचे कारण...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलवर नाराज होऊल कपिलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला.
- स्वत: कपिलने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
- कपिल म्हणाला होता, 'आम्ही चांगली सुरुवात केली होती आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. मागील तीन वर्षांपासून आम्ही प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. परंतु आमचा शो प्रेक्षकांचा छंद झाला तर त्यांनी सेम लाइनवर एक दुसरा शो लाँच केला.
- मला माहिती आहे, की चॅनलवर कामाचा दबाव असतो. परंतु एखाद्या हिट शोला डिस्टर्ब करणे योग्य नाहीये.
- नवीन शो लाँच करणे चांगली गोष्ट आहे, परंतु एकसारखाच कंटेंट आणि सेलिब्रिटी नसायला हवेत. मी चॅनलच्या मुख्य लोकांचा आदर करतो.
- मात्र मला या गर्दीची भाग व्हायचे नाहीये, म्हणून मी माझा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'
कोणत्या गोष्टीमुळे नाराज आहे कपिल...?
- सांगितले जाते, की 'कॉमेडी नाइट्स बचाओ' शोमुळे कपिल नाराज आहे. हा शो कृष्णा अभिषेक होस्ट करत आहे. कृष्णा अभिनेता गोविंदाचा नातेवाईक आहे.
- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'प्रमाणेच 'कॉमेडी नाइट्स बचाओ'मध्येसुध्दा सेलिब्रिटी सिनेमाच्या प्रमोशनसाठी येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिलच्या शोचे काही अविस्मरणीय क्षण...पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...