आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी...\'मध्ये पुन्हा \'गुत्थी\'च्या विनोदांची फोडणी, सुनील शोमध्ये करणार पुनरागमन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास सहा महिन्यांपूर्वी मागील नोव्हेंबरमध्ये 'गुत्थी' अर्थातच सुनील ग्रोवरने भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झालेला कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स...' हा टीव्ही शो सोडला होता. त्यानंतर शोविषयी अनेक चर्चा झाल्या होत्या. चर्चा होणेसुध्दा साहजिकच होत्या. कारण शोचे मुख्य पात्र 'गुत्थी' शो सोडून जाणार होती.
या गोष्टीचा 'कॉमेडी नाइट्स...'च्या टीमला मोठा धक्काच बसला. सोबतच, प्रेक्षकही नाराज झाले होते. प्रेक्षकांच्या मनात 'गुत्थी' नावाच्या पात्राने आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारा सुनील ग्रोवरने केवळ स्टँडअप कॉमेडीला वेगळे वळणच नव्हे तर शोचा टीआरपीसुध्दा वाढवला होता.
कपिल आणि सुनील यांच्या जोडीने शो अशाप्रकारे लोकप्रिय केला, की इतर शोच्या तुलनेत हा शो प्रसारित होण्याच्या काही दिवसांतच टीआरपी मिळवायला लागला होता. परंतु अचानक सुनील शोपासून वेगळा झाला. त्यानंतर त्याने स्वत:चा 'मॅड इन इंडिया' शो प्रसारित केला. परंतु हा शो पूर्णत: फ्लॉप झाला आणि आता ऑफ एअर झाला.

विशेष गोष्टी अशी, की आता 'गुत्थी' पुन्हा कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यास तयार झाली आहे. कपिल आणि सुनील दोघेही पुन्हा एकत्र काम करण्याच्या बातम्या येत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलने पुन्हा एकदा शोसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कपिलनेसुध्दा त्याचे स्वागत केले आहे. परंतु अद्याप या गोष्टीचा स्पष्ट उलगडा झालेला नाहीये, की सुनील 'गुत्थी'च्या पात्रातच शोमध्ये पुनरागमन करणार आहे का नाही?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सुनीलने शो सोडण्याने निश्चित कारण...