आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Happy B'Day: 28 वर्षांची झाली 'गोपी बहू', पाहा जियाची ग्लॅमरस छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'साथ निभाना साथिया' आणि 'जीनी और जूजू' फेम अभिनेत्री जिया मानेक आज (18 फेब्रुवारी) आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. जियाचा जन्म 18 फेब्रुवारी 1986 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. 'साथ निभाना साथिया' या मालिकेमुळे जिया घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली 'गोपी बहू'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.
महाविद्यालयीन जीवनात असताना तिने ब-याच ऑडीशन दिल्या. त्यातच तिला छोट्या पडद्यावर पहिली संधी मिळाली. जिया आत्तापर्यंत 'न घर के न घाट के', 'साथ निभाना साथिया', 'जीनी और जूजू' या मालिकांमध्ये झळकली आहे. अभिनेत्रीसोबत तिला मॉडेलच्या रुपातही ओळखले जाते.
'अमूल' आणि 'वाटिका हेयर ऑईल' या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. याशिवाय झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोमध्ये तिने आपल्या डान्सची झलकही प्रेक्षकांना दाखवली आहे.
जियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या काही खास ग्लॅमरस छायाचित्रांवर...